लेख
....कार्यकर्ता 2
एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावले. म्हणाले, "आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू."
साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबाना ठामपणे सांगितलं, "धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........"
सत्तूला उदास वाटत होतं.
हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली.
.....कार्यकर्ता.....
गरीबांचा बुलंद आवाज.....
साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा.........
नाद नाय करायचा वाघाचा...
येऊन येऊन येणार कोण??"
घोषणांनी सत्तुचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच- सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता....
पक्षाचं काम करताना सत्तूचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही.....
मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण.
साखळी Break the chain
त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं.
मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे
मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे...
सध्या भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने बराच गोंधळ (फक्त सोशल मिडीयावर) चालू आहे. अगदि परवा परवा हिमांशू राय ह्यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली तेव्हा देखील एवढा गदारोळ मजला नव्हता, म्हणजे हळहळ सगळ्यानी व्यक्त केली पण हे भैयुजी महाराज पडले महाराज, राष्ट्रसंत वगैरे, मग संत, महाराज, बाबा वगैरे लोकांनी आत्महत्या करावी का असे प्रश्न विचारले जाऊ लागले . कसा काय कुठून पण समाधी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या नाही काय, स्वा.सावरकरानी प्रायोपवेशनाने प्राणार्पण केले ती आत्महत्या नव्हती काय?
डेव्ह फर्नांडिस बुलेटिन - जुन २०१८
१. महाराष्ट्र शासनाने शनी शिंगणापूर ह्या हिंदू मंदिरावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. [१] हिंदू स्वराज्याच्या स्थापने साठी नवीन राजसत्ता उभी करणाऱ्या शूरांच्या भूमीत सध्या शनिदेव सुद्धा शासनाच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकत नाहीत. हिंदू भाविकांचा पैसे गिळंकृत करून शासन हा पैसा आपल्यावर आणि बाबू लोकांवर खर्च करणार आहे. (हल्लीच शिर्डी संस्थानचे ७१ कोटी रुपये सरकारी मेडिकल कॉलेजना काढून देण्यात आली)
२.
मा.ल.क.-४
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.
कुलदिपक भाग ५
बहता हे मन कही, कहा जानती नही
कोई रोक ले यही, भागे रे मन चला आगे रे मन कही
जाने किधर जानू ना
मेघा स्वतःशीच गुणगुणत स्वयपाकघरात काम करत असते. पण तिच कामात लक्ष कुठ असत ते तर कधीच गेलं पुण्याला विकी सोबत
कालचा तो प्रसंग तिच्या डोळ्या समोरुन झरझर सरकू लागतो. शेवटी चाचरत का कसेना तिने विकीच्या हातात हात देऊन त्याच्या मैत्रिला पुष्टी दिली.
' त्याच्या हातात हात दिला मी. किती छान वाटल ना! तो स्पर्श मला हवाहवासा का वाटतोय. परत कधी भेट होणार आमची. छे बाई ईतकी का उद्विग्न होतेय मी त्याच्या भेटीसाठी? काय होतय मला हे? कशातच का मन लागत नाहीये? '
" अग ये पोरी ध्यान कुटं हाय?
मला भेटलेले रुग्ण - १६
https://www.misalpav.com/node/42489
मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.
मिसळपाव