Skip to main content

लेख

तू मने गमे छे !

लेखक भन्नाट भास्कर यांनी गुरुवार, 03/05/2018 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते. मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो. तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती.

१८२६ सालातील प्रवासीमित्र - भाग १.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 02/05/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते.

ग्रामीण करमणूक-मनोरंजन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/05/2018 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत.

नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 01/05/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का? नास्तिक असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुळात आपण नास्तिक आहे कि नाही हे ठरवणे सुद्धा फार अवघड आहे. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा किंवा देवा धर्माचे अस्तित्व न मानणारा माणूस, हा प्रचलित पण फार संकुचित अर्थ झाला. देव न मानणे ह्याकरता निरीश्वरवादी ही संज्ञा आहे, तसच अज्ञेयवादी ही संज्ञा देवाच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका किंवा संशय व्यक्त करणाऱ्यासाठी वापरली जाते. नास्तिक ह्या शब्दाची फोड करून पहावे म्हटले तर देवाचे अस्तित्व नाकारणारा असा अर्थ अनेक ‘जन’ जो काढतात, पण तो ओढून ताणून काढलेला अर्थ वाटतो.

किस्सा ए पारसी

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/04/2018 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
किस्सा ए पारसी पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ४

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 30/04/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love) कथा - ४ यात्रा.. (प्रेमाचा प्रवास..) समोरून ती येत होती.. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.. पाहताक्षणीच कोणालाही आवडतील इतके सुंदर डोळे.. डोळ्यावरूनच तिच्या सौन्दर्याचा अंदाज येत होता.. पण स्कार्फने चेहरा झाकल्याने ते सौन्दर्य सध्या तरी भूमीगतच होतं.. आणि कानात त्याच्या मोबाईलवरचे गाणे घुमत होते..

हिममानव यती - सत्य की मिथक?

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 29/04/2018 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिममानव यती ---------------------------------------- २२ सप्टेंबर १९२१ लेफ्टनंट कर्नल चार्ल्स हॉवर्ड-बरी याच्या नेतृत्वात असलेल्या ब्रिटीश एव्हरेस्ट मोहीमेतल्या सदस्यांपैकी स्वत: हॉवर्ड-बरी, जॉर्ज मॅलरी, गाय बलॉक, हेन्री मोर्सहेड, सँडी वॉलस्टन, एडवर्ड व्हीलर हे सहाजण सव्वीस शेर्पा पोर्टर्ससह पहाटे ४ वाजता २०,००० फूट उंचीवरच्या आपल्या कँपमधून बाहेर पडून लाखपा ला खिंडीच्या मार्गाला लागले होते. हॉवर्ड-बरीची ही एव्हरेस्ट मोहीम शिखरावर प्रत्यक्षं चढाईचा प्रयत्नं करण्यापेक्षा एव्हरेस्ट परिसराची आणि आजूबाजूच्या शिखरांची माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने आखण्यात आली होती.

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/04/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो " काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/04/2018 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते.

केळीचे सुकले बाग ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 18/04/2018 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.