Skip to main content

लेख

कुलदिपक भाग ४

लेखक विप्लव यांनी मंगळवार, 19/06/2018 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो. "अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले. " अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं. आणि मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 16/06/2018 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध https://www.misalpav.com/node/42796 इथे आहे ************** ‘ड’चा अभाव आणि आजार : हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात: डोक्याचा खूप मोठा आकार बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट पाय धनुष्यकृती आकारात वाकणे मूल वेळेत चालायला न लागणे दात योग्य वेळेवर न येणे वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते.

ग्रामीण आणि इतर वाद्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/06/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची. अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे.

कुलदिपक भाग ३

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 15/06/2018 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले काकूंना पेढे देऊन मेघा घरी परतत होती तोच तिच्या लक्षात आले की " अरेच्चा शर्मिष्ठेच्या घरी पेढे द्यायला तर विसरलेच की मी. काय वेंधळी आहे ना मी!" स्वत:शीच बडबडत मेघा आपल्या प्रिय बालमैत्रिण म्हणजेच शर्मिष्ठाच्या घराकडे वळली. " नलू काकू, शमू आहात का घरी?" दरवाज्यातून हाका मारत मेघा शर्मिष्ठाच्या घरात शिरली. दिवाणखाण्यातून आत जाताना काहितरी अस्पष्ठ कुजबूज तिच्या कानी पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत ती माजघरात गेली तोच खमंग तळणाचा वास तिच्या नाकात शिरला. " अहाहा काय खमंग वास दरवळतोय नलू काकू! काय तळताय चकल्या का?" " अरे ये ना मेघा आत. होय चकल्या करतेय बग.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम

लेखक सुधीर कांदळकर यांनी गुरुवार, 14/06/2018 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ४ दोन मोठे शास्त्रज्ञ पदुआ विद्यापीठाशी निगडित होते. पहिला निकोलाय कोपर्निकस आणि दुसरा गॅलीलीओ.

एक उनाड संध्याकाळ

लेखक सचिन काळे यांनी सोमवार, 11/06/2018 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या" मग काय? ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू.