Skip to main content

चौकशी

तुमचा पासवर्ड चेंज करा ....

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 24/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ... आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ... किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी.

उपकरणे घेताना

लेखक वरदा यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला स्वयपाकघरात बर्‍याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्‍यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने.

मी नाही अभ्यास केला

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.
Taxonomy upgrade extras

न्याहारीचा पदार्थ उकरपेंडी

लेखक संजय अभ्यंकर यांनी सोमवार, 18/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
१. आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत. तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत. त्यांना एक प्रश्न: महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी. त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय. बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही. २. उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत. संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे.

स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा प्रश्न पडला आहे. मी दिलेल्या प्रतिक्रीयांचे किंवा उत्तरांचे संपादन करता येते कारण "संपादन" पर्याय तिथे दिसतो. परंतु मूळ लेखनातच काही दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय नाही. तांत्रिक विभागाने पहाणी करुन योग्य तिथे दुरुस्ती करावी ही विनंती. अवांतर - माझ्याप्रमाणेच आणखीही काही जणांना हा प्रश्न पडल्याचे वाचले आहे. चतुरंग

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 10/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

आर. एन. पराडकर एम्.पी. ३

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 19/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आर. एन. पराडकरांची एम्.पी. ३ हवीत. कोणाकडे असल्यास कळवा. "गगनीते नंदादीप जळती" ऐकून बराच काळ लोटला. संजय अभ्यंकर

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

बिननावाची कथा - १

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 29/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
नॅशनल जिओग्राफिकच्या बहुधा नोव्हेंबरच्या अंकात मानवी स्मरणशक्तीवर एक अप्रतिम लेख आला होता. त्यापूर्वी सायंटिफिक अमेरिकन मासिकाच्या जुलै मधील अंकात "द मेमरी कोड" नावाने एक सुंदर लेख आला होता. हे लेख वाचून एक कथा सुचली. अद्याप अपूर्ण आहे. अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेअभावी अद्यापि पूर्ण करणे जमले नाही. मात्र कथा कशी विकसित होत आहे हे हॉटेलातील मंडळींकडून ऐकायला आवडेल. शिवाय कथेला नावही अजून दिलेले नाही. एक नाव मनामध्ये आहे. पण ते देण्यापूर्वी तुम्ही याला काय नाव द्याल?