Skip to main content

भाषांतर

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 22/09/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४ मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती २६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती.

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 29/07/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar पुर्व प्रसिध्दी - अनुभव मासिक ------------------------------------------------------------------------------ नवीन वर्ष माझ्यासाठी शुभेच्छा असलेल्या भेटकार्डांचा नॉट पेड लिफाफा घेऊन अवतरलं. राजकारण्यांसाठी ते मतपेट्या घेऊन आलं होतं. दोन्हीही नॉट पेडच! मला शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी दहा रुपये खर्च करावे लागले. राजकारण्यांना खूपच "नॉट पेड' चार्ज चुकवावा लागेल. माझ्या आसपास "लोकशाही वाचवा...प्रजातंत्र वाचवा...घटना वाचवा...' अशा घोषणा दिल्या जाताहेत.

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

माझे आगामी पुस्तक!!

लेखक नाटक्या यांनी शुक्रवार, 17/07/2009 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याचे शीर्षक बघून कदाचित तुम्ही विचार केला असेल की नाटक्याने नेहमीचा 'साकीया..." अस नेहमीचा विषय न निवडता असा गंभीर विषय का निवडला? आणि जरी तो तसा असला तरी आत स्वत:च्या पुस्तकाबद्दल लिहीले असेल तर ते कॉकटेल संबधीचेच असावे. खरं तर मला त्या विषयावर पण पुस्तक लिहायची ऑफर आपल्याचा एका मिपाकरांनी दिली होती. तर ते असो.. मी सध्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करायला घेतला आहे.

"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 23/06/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
ही मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या (Decadent) पाश्चात्य वृत्तसंस्थेवरील मुलाखत नसून "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत असून ती कालच (२१ जून ०९ला) अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झाली. अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढ

मथुरानगरपती

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/06/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे कृष्णार्पण इथे! मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!

बस इतकंच सांगायचंय

लेखक धनंजय यांनी सोमवार, 13/04/2009 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
बस इतकंच सांगायचंय . फ्रीजमधे होते ते दही मी खाऊन टाकले - संपवले . बहुधा तू ते होतेस जपले विरजणासाठी उद्याच्या . मला माफ कर, ते मस्त होते किती मलईदार अन् किती गार . --- हे पुढील कवितेचे रूपांतर आहे : --- This Is Just To Say . I have eaten the plums that were in the icebox . and which you were probably savin
Taxonomy upgrade extras