मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन - एप्रिल २००९

ॐकार · · कलादालन
लेखनविषय:

वाचन 17568 वाचनखूण प्रतिक्रिया 42

मदनबाण Sat, 04/18/2009 - 00:20
अरे एकदम जबराट्ट्ट्ट्ट्ट... :) ॐकारराव लयं भारी रेखाटन. मला वाटतं मिपा वरच मी पाहिलेल हे अत्ता पर्यंतच सर्वात सुंदर रेखाटन आहे. केवळ अप्रतिम... :) (कला प्रेमी) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

बेसनलाडू Sat, 04/18/2009 - 00:20
मस्त! डावा डोळा प्रमाणात अगदी किंचितसा हुकल्यासारखा वाटतोय मात्र :( (छिद्रान्वेषी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

श्रावण मोडक Sat, 04/18/2009 - 13:32
जिवाला हात घालते हे खरे, पण बेला म्हणतो त्याप्रमाणे डोळा हुकला. स्वगतः हा ओंकार म्हणायचा या मोडकांचे लक्ष डोळ्याकडेच का असते? मागल्या चित्रातही डोळ्यातच गडबड दाखवली होती.

चतुरंग Sat, 04/18/2009 - 00:52
केसांच्या दोन घट्ट जुड्या बांधलेली, परकर-पोलक्यातली, गोबर्‍या गालाची निरागस बाहुली काळजात शिरली थेट! ॐकारशेट फारच सुंदर चित्र. कमाल का काम!! :) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय Sat, 04/18/2009 - 01:55
फारच गोड मुलगी. आणि ते पेन्सिलीने उतरवायचे कौशल्य औरच.

नंदन Sat, 04/18/2009 - 01:00
कुणीतरी आत्ताच तिला 'किती छान नाच केलास/किती सुंदर गाणं म्हटलंस' असं म्हणतं आहे आणि ती थोड्या आश्चर्याने, आनंदाने पाहते आहे असं वाटावं इतकं सुरेख रेखाटन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

भाग्यश्री Sat, 04/18/2009 - 01:50
काय पण खोट्टं बोलतात लोकं !! हे काय हाताने काढले आहे? शक्यच नाही!! :O हे जर हाताने काढलेले रेखाटन आहे तर आमच्यासारख्या शिकाऊंनी पेन्सिल हातात धरूच नये !! :( www.bhagyashree.co.cc

प्रमोद देव Sat, 04/18/2009 - 06:00
गोडुली आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by प्रमोद देव

अनिल हटेला Sat, 04/18/2009 - 06:13
हीट है हीट ....सुपरहीट !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु Sat, 04/18/2009 - 06:24
किती गोड आहे पोर.. खूपच लाघवी आलय चित्र. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति Sat, 04/18/2009 - 06:25
खूप गोड! चेह-यावरचे "नवल वर्तले गे माये" भाव केवळ अप्रतिम! :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

सुनील Sat, 04/18/2009 - 16:37
मस्तच. रेखाटन आवडले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री Mon, 04/20/2009 - 09:44
रेखाटन फारच सुरेख जमले आहे. आजवर मिपावर पाहिलेल्या रेखाटनात सर्वोत्तम.

रम्या Mon, 04/20/2009 - 11:23
गोबरे गोबरे गाल, टोक आलेली हनुवटी, किंचीत उघडलेले नाजूक ओठ, आणि त्यातून किंचितसी दिसणारी दातांची रांग आणि डोळ्यातील निरागस हसरे भाव!! अतिशय सुंदर रेखाटन!! आम्ही येथे पडीक असतो!

सागर Mon, 04/20/2009 - 12:04
अगदी सुंदर छकुली आहे. अजून रेखाचित्रे येऊ द्यात ओंकार जबर्‍या काढता तुम्ही... खास करुन छकुलीच्या डोळ्यांत भाव छान दाखवले आहेत... -सागर

ठकू Tue, 04/21/2009 - 12:40
पटकन उचलून पापी घ्यावी, इतकी गोड आहे ही सोनुली. केसांचे चाऊ-माऊ मस्त वाटतात. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

टिउ Wed, 04/22/2009 - 19:26
छायाचित्र वाटतंय...अप्रतीम! गणपा...तुमची लेक फारच गोड आहे... :)

यन्ना _रास्कला Tue, 04/28/2009 - 06:44
आवडल. पन एक आहे डाव्या डोल्याविषयी लोक बोलतात तिकड लक्श देउ नका कारन लहान मुल कदीकदी पाहतात तेवा तिरळ असतात अस वाटत. जास्त करुन फोटु जवलन घ्येतला कि. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !