Skip to main content

भाषांतर

मी अगदी मजेत आहे

लेखक मोगॅम्बो यांनी गुरुवार, 08/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एका इंग्रजी कवितेचा अनुवाद आहे. मूळ कवी कोण ते मला माहीत नाही. कविता कधी आणि कुठे वाचली ते सुद्धा आठवत नाही. पण आवडली म्हणून लगेच अनुवाद करून ठेवला होता. तो आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय.
Taxonomy upgrade extras

!! केयर टेकर !!

लेखक अनिल हटेला यांनी शुक्रवार, 02/01/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रींग ट्रींग !! सकाळची १०.०० ची वेळ ! इन्सपेक्टर प्रधानांची केबीन! हातातला चहाचा कप खाली ठेवत त्यानी फोन रीसीव्ह केला.. "नमस्कार!इन्सपेक्टर प्रधान बोलतोये" "नमस्कार साहेब ,मी कोमठेकर ! थोडं काम होत..४ दिवस झालेत आमचा केयर टेकर चंदु पवार गायब आहे..नाही मिसींगची कंप्लेंट केलीये .आणी सर्व नातेवाइक ,ओळखीचे ,मित्र-परीवार सर्वाना फोन झालेत.' "काळजी करु नका कोमठेकर ..मी बघतो..ठीकाये ...येतोये मी तासाभरात बंगल्यावर...धन्यवाद' कोमठेकर !! साधारन पन्नाशीचा ग्रुहस्थ ! तसा सिंगापूर लाच स्थायीक ..स्वतःचा बीजनेस...नवरा -बायको आणी एक कन्यारत्न..तेसुद्धा उच्चशिक्षणासाठी अमेरीकेत...

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 29/12/2008 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्‍या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे. कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे.
Taxonomy upgrade extras

निरव पावले (अनुवाद-गीतांजली)

लेखक लिखाळ यांनी शनिवार, 20/12/2008 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील एका गीताचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न करत आहे.
निरव पावले तुम्ही ऐकली नाहित का त्याची निरव पावले? तो येतो, येतो, नेहमीच येतो प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री तो येतो, येतो, नेहमीच येतो गायली आहेत मी अनेक गाणी मनाच्या विविध स्थितींमध्ये, परंतु त्यांच्या सुरावटीने नेहमी हेच उद्घोषित केले, 'तो येतो, येतो, नेहमीच येतो' स्वच्छ सुगंधी वसंतात रानवाटांनी तो येतो येतो, नेहमीच येतो आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत,
Taxonomy upgrade extras

वाटसरूच्या पाऊलखुणा (अनुवादित)

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/12/2008 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाटसरूच्या पाऊलखुणा ****************** वाटसरू रे, पाऊलखुणा - त्यांनाच म्हण "पाऊलवाट". वाट अशी नसतेच म्हणा - तूच चालून बनते वाट. वाट बनते तूच चालून - मागे बघ - ती बघशील वाट नवी; पण वळून, कधी पुन्हा तुडवशील? वाटसरू! नसतेच "वाट"- फक्त नावेमागची लाट. मूळ कवी : आंतोनियो माचादो (१८७५-१९३९); मूळ भाषा स्पॅनिश Campos de Castilla संग्रहातील "म्हणी आणि गाणी - क्रमांक २९" मधील या ओळी सर्वात प्रसिद्ध आहेत. अनुवाद : धनंजय
Taxonomy upgrade extras

शांती अन् मुक्ता

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
ग्वेंडोलिन ब्रूक्स (१९१७-२०००) ही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमधील एक महत्त्वाची कवयित्री होऊन गेली. तिची कर्मभूमी शिकागो शहराचा दरिद्री आणि ओबडधोबड दक्षिण भाग. त्या परिस्थितीत पिचणारी, त्या परिस्थितीतही भोग भोगणारी, अशी माणसे तिच्या कवितांमध्ये उतरली आहेत.
Taxonomy upgrade extras