Skip to main content

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/02/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे. आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

पोथ्यांचा अमूल्य खजिना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 16/02/2012 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे. (श्री शरद यांनी मागे काजळाची शाई वापरून पाण्यातही अभंग सुरक्षित ठेवण्याचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाशी हे सुसंगत असल्याने यांना हा दुवा पाठवला होता. त्यांनी तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले म्हणून देत आहे.

चोरी झालेले दुसर्‍या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शनिवार, 04/02/2012 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
पांढर्‍या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालयातून चोरीला गेलेले होते. या शिल्पात 8 व्यक्ती कोरलेल्या असून या व्यक्ती प्रत्येक ओळीत 4, याप्रमाणे दोन ओळीत उभ्या असलेल्या , कोरलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या शरीराचा भाग तुटून गेला आहे तर बाकीच्या व्यक्तींची नाके बहुतांशी विद्रूप केलेली आहेत. सर्व व्यक्ती डावीकडे बघताना दाखवल्या आहेत.

अनिल मोहिले यांचे निधन

लेखक मराठी_माणूस यांनी बुधवार, 01/02/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन. ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे. मनःपुर्वक श्रध्दांजली.

कुत्री आणि टोळ

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शुक्रवार, 27/01/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहायला घेताना का कोण जाणे, मला लुई कॅरॉल (Lewis Carroll) हे टोपणनाव घेतलेल्या लेखकाने लिहिलेल्या 'ऍलिस इन वन्डरलॅन्ड' (Alice in Wonderland) या पुस्तकातल्या काही प्रसिद्ध पंक्तींची खूप आठवण येते आहे. या पंक्ती आहेत
"The time has come," the Walrus said, "To talk of many things: Of shoes--and ships--and sealing-wax-- Of cabbages--and kings-- And why the sea is boiling hot-- And whether pigs have wings."
एकमेकाशी काहीही संबध नसलेल्या अनेक गोष्टींचा या पंक्तींच्यात जो असंबद्ध मेळ घातलेला आहे त्याला बहुदा कोठेही तोड नसेल.