एक मरा'ठी', लाख मरा'ठी'
मोर्चाला उदंड प्रतिसाद! खरंच गंमत वाटते या सगळ्या लोकांची. केवढा जमाव, केवढी बांधाबांध, घोषणा, सोशल मिडियावर संदेश... सॉलिड सगळं. पण नक्की कशासाठी आहे हे? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला तर कदाचित उत्तर चटकन मिळणार नाही. कारण तसा विचारच केलेला नसेल. आणि तेच हवं असतं मोर्च्याच्या मागे असणार्या मंडळींना. पण आश्चर्य वाटतं की कुणाचाच विचार व्यापक कसा होत नाही? पदोपदी आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातंय तरी कळूच नये ही गोष्ट? म्हणजे मोजके लोक हजारो लोकांना एका अशा गोष्टीसाठी एकत्र आणू शकतायत, जी गोष्ट मिळेल, न मिळेल, तिचा आपल्याला नेमका काय फायदा होईल याची काडीमात्र कल्पना त्या लोकांना नाही.
अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.
हमारा स्टेशन हमारी शान
'बोरीवली स्टेशनचा कायापालट'
अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं.
मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.
मिपा शासन
आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग
ठाणे उपविभाग ठाणे
बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे
दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता
वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535
प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बाप ------- हवा आहे पण कशाला?
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!
अता खेळी महाराष्ट्रातील कामाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा
ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर.
त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा:
पहिली भेट२०१५मध्ये दिली
नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला.
खासदार निधीतून २.७
कुणाचेही काहीच चुकलं नाही?
सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे.
शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली.
एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले.
मुखपृष्ठ :
माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.
माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.रिओ ऑलिम्पिक २०१६
रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.
मिसळपाव