Skip to main content

कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 11/04/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
. (याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे) डिअर ऑल, हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला.

द अंडरटेकर रिटायर्स

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 04/04/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 30/03/2017 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो. आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!! होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे!

पांडू पाटील

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी बुधवार, 29/03/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली.

गोविंदराव तळवळकर

लेखक विकास यांनी बुधवार, 22/03/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

नवप्रवर्तनाचा सोहळा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 20/03/2017 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
४ ते १० मार्च राष्ट्रपती भवनाच्या आवारात ’नवप्रवर्तन उत्सव’ साजरा झाला. २०१५पासून हा उपक्रम सुरू आहे आणि यंदाचे तिसरे वर्ष होते. मला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल गार्डन पहायला म्हणून गेलो आणि बाहेर पडताना हे दिसले तर आत घुसलो. सुखद धक्का बसला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पकतेला व्यासपीठ दिले होते. एक वैद्यकीय इनोवेशन्सना दिलेला विभाग सोडला तर उर्वरित सगळे संशोधक तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य भारतीय होते. जवळपास सगळेच ग्रामीण भागातील रहिवासी. त्यांचे संशोधनसुद्धा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे.

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

विजयासाठी - रातीस खेळ चाले ....

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 25/02/2017 21:19 या दिवशी प्रकाशित केले.

रातीस खेळ चाले ...

निवडणुकीचा रणधुमाळीत जिल्हा सांगली, शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात विरोधकांच्या पाडावासाठी भानामती! हे शीर्षक असलेले बातमीपत्र दिगंबर शिंदे यांनी सांगलीहून पाठवले होते. (लोकसत्ता शनिवार. दि 25 फेब्रूवारी 2017, पुणे आवृत्ती, पान 8 - राज्यकारण) या बातमीत जणू काही किराणाभुसारी मालाच्या यादीची आठवण व्हावी अशी लांबलचक मागणी वाचून रंजन झाले... खिळे ( 6 इंची नग) ९, लिंबू (आकार मोठा नग) २१, टाचण्या (१इंची?) नग २१, रंगीत बाटल्या ७ (श्रमपरिहारासाठी?), बिनशेडीचे नारळ नग ६, साड़ी?

तो परत येतोय !

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 25/02/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला, त्याला पाहिलं आणि त्याने सगळ्यांना जिंकलं. अनेक वर्षे त्याने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याच गारुड इतकं की लोक 'त्याच्यासाठी कायपण' म्हणायचे. होय. तोच तो, नोकीया ३३१०. नोकियाचा सुपरहिट 3310 हा 'अनब्रेकेबल' आणि 'अनबिटेबल' मोबाइल परत एकदा बाजारात येतोय. नवीन रुपातील या मोबाईलची किंमत सुमारे ४५०० रुपयापर्यंत असू शकते. तो स्मार्ट फोन नसुन फिचर फोन असणार आहे. स्क्रीन कदाचित रंगीत असणार आहे. नव्या 3310ची बॅटरी आधीसारखीच दीर्घकाळ टिकावी, यादृष्टीने डिस्प्ले जास्त प्रकाशमान नसेल.