आगंतुक पाहुणा
रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा
हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला. कॅमेरा सरसावुन पाहुणे कुठल्या बाजुने बरे दिसतील असा अंदाज घेत असतानाच पुन्हा पाहुण्यांचे भ्रमण सुरू झाले. अपल्या मंदगतीने पाहुणा सावकाश बिछान्याच्या परिघाने फिरत होता. मधेच थबकायचा. किरण साधायला जावे, तर पुन्हा गाडी सुरू. पाहुणा पुढे, मी मागे असे चालले होते. आता साहेब कडेला आले, आणि 'माझे चित्र टिपायचे आहे का? तर हरकत नाही, थांबतो मी जरा' अशा थाटात मागे वळले आणि माझ्या दिशेने तोंड करून उभे राहिले.
चित्र टिपुन होताच पाहुणा पुन्हा तुरुतुरू फिरायला लागला. मधेच पाहुण्याने पंख फडकावले आणि अचानक लक्षात आले की पाहुणा केवळ हिरवाच नव्हे तर चांगला रंगीतही आहे! पंख वर उचलताच पाठिवरील व पंखांच्या आतील भागाचा तपकिरी भाग व कडेचे बारिक ठिपकेनजरेत भरले.
रात्रीचे बारा वाजत आले होते. पाहुण्यांचे कौतुक आता बास झाले. या पाहुण्यांना घरात ठेवुन घेणे बरे दिसत नव्हते. उगाच अंगाखाली चिरडले, कुठे बाधा झाली तर नसता व्याप व्हायचा. एका कागदावर हलक्या हाताने पाहुण्याला उचलले आणि बाहेर सोडले.

वाचने
3674
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
हाहाहा..
पाहुणा लयं
क्या बात
पाहुणा
साक्षी,
साक्षीदेव
काय किडा आहे!!
वा!