गोड गोड माणूस .
नमस्कार .मी हेमंत रायकर. व्यवसायानी प्रकाशक. आमचा हा व्यवसाय जयहिंद प्रकाशन -रायकर ब्रदर्स या नावानी प्रसिध्द आहे. आमचे वडील (कै) ग.का. रायकर यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि नावारुपाला आणला. तो काळ मराठी साहीत्याचा -मराठी मासिकांचा -दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ होता. श्री दीपलक्ष्मी आधी मासिक होते. सध्या श्री दीपलक्ष्मी हा दिवाळी अंक नियमीत स्वरुपात येतो. या व्यवसायाच्या निमीत्ताने माझ्याकडे उत्तमोत्तम साहीत्याचा खजीना उपलब्ध आहे. या खजीन्यातून काही निवडक लेख मिसळपावच्या वाचकांना द्यायचा मनसुबा आहे*. या मालीकेतला हा पहीला लेख जयवंत दळवींचा आहे.
मिसळपाव