आफ्रीकन अमेरीकन बडबडगीत - कुम्बायाह
मुलगी लहान असताना, आमचा आवडीचा खेळ म्हणजे - एकत्र बडबडगीतं गाणं. पैकी मला आठवणारी बहुतेक बडबडगीतं मराठी होती. कारण इंग्रजी ५ वी पासून चालू झालेलं. त्यामुळे मुलगी देखील मराठी गाणी सर्वात आधी शिकली. "ससा रे ससा नी कापूस जसा" असो की "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या" किंवा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" असो तिला गाणी ऐकायला आणि मला गायला अतिशय आवडत. आमचं मराठी आवडतं बडबडगीत होतं -
"आभाळ वाजलं धडाड्धूम
वारा सुटला सूं सूं सूंम
वीज चमकली चकचकचक
जिकडेतिकडे लखलखलख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहीलं सों सों सों
पाण्यांत बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला
डरांवडूक डरांवडूक!"
त्या मानानी "जॅक अँड जिल", "ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म", 'ईट्सी बिट्सी स्पायडर्"वगैरेंची गोडी तितकीशी कधीच लागली नाही.
पण एके दिवशी मात्र माझ्या कानी एक आफ्रीकन्-अमेरीकन स्पिरीच्युअल गाणं पडलं. इतकं, मधुर, इतकं अर्थपूर्ण! मी ते गोड चाल लाऊन गाऊ लागले आणि हां हां म्हणता आमच्या आवडत्या बडबडगीतांपैकी ते बनून गेलं.
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज क्राइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज प्रेइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज लाफींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज सिंगींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
इतकं सोपं, साधं लोकगीत पण अर्थगर्भ. सगळ्या सुंदर गोष्टी साध्याच असतात का? का साध्या गोष्टी सुंदर भासतात? मी अनेकदा अजूनही तुनळीवर हे गाणं ऐकते. मन हलकं होतं.
याद्या
4403
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
वाह
गणपा
In reply to वाह by गणपा
कसे सुचते
हं.....बड्बडगित....
मोठी
In reply to हं.....बड्बडगित.... by जाई अस्सल कोल्हापुरी
जाई, सह्ही
In reply to हं.....बड्बडगित.... by जाई अस्सल कोल्हापुरी
कुम्बायाह
वक्का
वा!
छान! येथे
वाक्का वाक्का !!
अहो त्या
In reply to वाक्का वाक्का !! by बबलु
दिपाली , ते
In reply to अहो त्या by दिपाली पाटिल
आय लाइक टू मूव्ह इट !!
वा वा वा.
मस्त आहे
डरांवडूक डरांवडूक