Skip to main content

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 12/04/2011 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो.

वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 12/04/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्‍या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.

वळवाचा पहिला पाउस

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 11/04/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह.

चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा

लेखक प्रभो यांनी सोमवार, 11/04/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती.. पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर...

रिकामा देव्हारा

लेखक शरद यांनी शनिवार, 09/04/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
याच देव्हार्‍यात होता .... याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार. नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर. समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत आणि उजळले विश्व काळ राहिला तेवत. कसे मला आता दिसे माझे वेगळे शरीर रिकाम्या देव्हार्‍याला पुन्हा माझा नमस्कार. शंकर वैद्य श्री. वैद्यांचा चमत्कार काय तो पाहण्याआधी थोडी अवांतर माहिती देतो. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली दोघेही अद्वैती. दोघांनी गीतेवर टीका लिहल्या. दोघांच्या मतात साम्य दिसल्याने डॉ.

ठकू आणि लच्छी!

लेखक नीधप यांनी शनिवार, 09/04/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच एक जुना लेख टाकतेय इथे. ------------------------------------------------ एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली. ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत.

उन्मन क्षण

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 05/04/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाचा तमीळ सहकारी रुपेश आणि इतर मित्रही घरी आले होता गप्पा मारायला, क्रिकेट वर्ल्ड कपचा जल्लोष संपला तरी चर्चा चालूच होत्या. For a change, मी सीएनएन लावलं. Anderson Cooper चं AC 360 चालू होतं, जपान मधल्या हाहा:काराचं वर्णन संपून सुरु झालं ते मध्य-पूर्वेत आणि इतरत्र पसरतच चाललेल्या अशांततेचं सविस्तर कव्हरेज. ट्युनिशिया आणि इजिप्त पासून सुरु झालेली जन-क्रांतीची लाट पसरत चालली आहे.... सिरीया, बहारीन, जॉर्डन तसंच लिबिया आणि येमेन - वडवानलासारखा जनेच्छेचा रेटा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतोय, कुठे तरी एखादा ओळखीचा नेता, पण बराचसा निर्नायकीच संग्राम.