Skip to main content

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

रतनगड..(छायाचित्रांसह)

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 26/04/2011 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन कुठे डोंगरात फिरायला जायचा योग आला नव्हता. रवीवारी संगमनेरवरुन डोंबिवलीला येता येता, अचानक, मामाच्या गावी, राजुरला जाणं झाल. राजुरला पोहचायलाच रात्र झाली होती. शेवटी पहाटे लवकर निघु म्हणत, मुक्कमाचा बेत ठरला. जेवण झाल्यावर सहज, मामेभावाबरोबर बोलता बोलता, दुसर्‍या दिवशी कुठेतरी भटकायला जायचा प्लॅन ठरला, ऑफीसच कस मॅनेज करता येईल, हे कोड पाच मिनीटात सुटल. राजुरसारख्या ठीकाणी असल्याने प्रचंड चॉईस होता. पाबरगड, कात्राबाई, अस्वल्या डोंगर, कुमशेत, आजोबा, हरिश्चंद्र, रतनगड व सांदण असे मस्त पर्याय होते (कळसुबाई मला फारसं नाही आवड्त उन्हाळ्यात ;-) ).

पिउनी अमृत घेउनी संचित...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/04/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार.. पाखरा जा.. (येथे ऐका) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे.. 'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं.

ये दौलतभी ले लो

लेखक शरद यांनी मंगळवार, 26/04/2011 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौलत भी ले लो गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल.

रिक्रिएशन

लेखक सूर्य यांनी रविवार, 24/04/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र बर्‍याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय. थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे. Recreation - सूर्य.

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

स्पेशल फीचर...

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/04/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : यशचं घर. (बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बाबा मुडपून आडवारलेले. यश हातात मोबाईल घेऊन घराच्या दाराबाहेर उभा. मोबाईलवर नजर अखंड खिळलेली आहे. एका हाताने मोबाईलची खूप फास्ट बटनं दाबत आणि मधेच त्यावरचा काहीतरी मजकूर वाचून खुदकन हसत तो उभा असतो. एक मोकळा हात सतत अस्वस्थपणे स्वत:चे खिसे चाचपत असतो. घराच्या किल्लीसाठी..पण मोबाईल वरची नजर मात्र एक क्षणही हटत नाही.) यश (स्वत:शी) : किल्ली कुठे गेली च्या मायला..(विचित्र टोन मध्ये मोठ्यांदा) पड्ली बिडली की क्कॉय…?!? (तेवढ्यात खिशातून खण्णकन किल्ली खाली पडते.