Skip to main content

होमी भाभा यांचा कलासंग्रह – चुकवू नये असे काही

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 31/05/2011 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं.

हम है मताअ-ए-कुचा

लेखक शरद यांनी मंगळवार, 31/05/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१ इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२ वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३ सीधी है राहे-शौक, पे यूं ही कहीं कहीं खम हो गयी है गेसू-ए-दिलदार की तरह ...४ अब जा के कुछ खुला ., हुनरे-नाखुने-जुनूं जख्मे-जिगर हुए लबो-रुख्सार की तरह ...५ "मजरूह", लिख रहे है वो, अहले-वफा का नाम हम भी खडे हुए है गुनहगार की तरह ...६ महरूह् मताअ ..मालमत्ता, माल, वस्तू. . कूचा--गल्ली. निगाह ... नजर. तश्नगी ... तहान. नादार ... निर्धन, कंगाल, गरीब. शै ...

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 29/05/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

मुंबई क्विझ...१..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 27/05/2011 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी. आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्‍यांचा तर अर्थात रोजच. पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्‍या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही. एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा. सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्‍याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती. ओळखण्याचा प्रयत्न कराल? १.

जात्यावरच्या ओव्या- अहिराणी भाषेतील!

लेखक आर्या१२३ यांनी गुरुवार, 26/05/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं ! दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

ट्युलिपोत्सव

लेखक मराठे यांनी मंगळवार, 10/05/2011 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी खर्‍या अर्थाने वसंत ऋतूचं दर्शन काही आम्हा अभाग्यांना झालेलं नव्हतं. नाही म्हणायला उगाच कुठेतरी एखादं झाड पालवलं होतं पण बरेचशी झाडं अजून निष्पर्णच होती. हवा सुधारेल सुधारेल म्हणता म्हणता ऋतू अर्धा संपत आला. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात (मे ८ ते मे १४) मिशिगन मधल्या हॉलंड या गावी ‘ट्युलिप उत्सव’ असतो. ह्यावर्षी तिथे जायचं असं आम्ही काही महिन्यांपूर्वीच ठरवलं होतं. पण एकंदर हवामान पाहता तिथे जाऊन निराशा तर होणार नाही ना अशीच धाकधूक वाटत होती. पण देवाला आमची दया आली असावी आणि चक्क शनिवारी पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.