Skip to main content

रिक्रिएशन

लेखक सूर्य यांनी रविवार, 24/04/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र बर्‍याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय. थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे. Recreation - सूर्य.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2700
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by मराठमोळा

आपल्या इच्छेप्रमाणे कृष्णधवल चित्र देत आहे. पण मला त्यात फायदा दिसत नाही. एक्स्पोजर कमी करून (स्पीड कमीकरून) चेहरा जरा सुधारता आला असता. scater शरद

फोटो नाही दिसला ......मागच्यावेळेस प्रमाणे वेगळॅए लिंक द्यावी ही विनंती

टेक्निकल गोष्टी काय आपल्याला कळत नाहीत खरं, पण ती पोरगी, तिच्यावर फोकस असावा, आजूबाजूचं वातावरण 'ब्लर' दिसत आहे आणि ऑब्जेक्ट सुस्पष्ट. चेहर्‍यावरील उन-सावलीचा फरकही उत्तम टिपला आहे.

वार्ताहार शैलीचे चित्र आहे, असे वाटते. बरोबर? स्केटिंग बद्दलच्या लेखासोबत (किंवा ही क्रीडापटू प्रसिद्ध असेल - बहुधा नसावी -, तर तिच्याबद्दलच्या लेखासोबत) देण्यालायक चित्र आहे. हात आणि पावले ही भावनेच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. यांची अपूर्णता प्रेक्षकाच्या मध्ये मुद्दामून जागवायची असल्यास ठीक, नाहीतर हात किंवा पावले कातरलेले (किंवा थोडक्यात फ्रेमच्या बाहेर असलेले) चित्र काढणे टाळावे.

In reply to by धनंजय

ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :) पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल. - सूर्य

In reply to by धनंजय

ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :) पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल. - सूर्य