Skip to main content

चित्रचक्कर क्रमांक १ ते २३

Published on बुधवार, 10/08/2011
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे. लता मंगेशकरांनी गायलेले गाणे देखील तसे सोलोच आहे पण फक्त एकच ओळ किशोर ने गायली आहे. पण हा किशोर (म्हणजे लताच्या गाण्यात फक्त एक ओळ गाणारा) गायक किशोरकुमार नाही. तर हा चित्रपट कोणता? हिंट - या चित्रपटाच्या शीर्षकात चार शब्द आहेत. जर शीर्षकातील ह्या शब्दांना १, २, ३, ४ असे क्रमांक दिले तर हेच शब्द या चित्रपटाच्या शीर्षक गीतात १, ४, ३, २ या क्रमाने येतात. चित्रचक्कर क्रमांक ३: ओळखा पाहू - एक अन्यायग्रस्त महिला - तिची दोन मुले - मोठेपणी एक पोलीस तर दुसरा स्मगलर होतो. एवढे वाचून लगेचच डोळ्यासमोर येतो तो दीवार (१९७५ सालचा). आता यात थोडा बदल करुन एक अन्यायग्रस्त महिला - तिची दोन मुले - मोठेपणी एक पोलीस तर दुसरा देखील पोलीस च होतो. एवढे वाचून डोळ्यासमोर कुठल्या हिन्दी चित्रपटाचे नाव येते? चित्रचक्कर क्रमांक ४: ओळखा पाहू - ’बापके कंधे पर बेटेकी अर्थी’ हा संवाद ’शोले’ व्यतिरिक्त आणखी कुठल्या हिन्दी चित्रपटात आहे? चित्रचक्कर क्रमांक ५: ओळखा पाहू - हिन्दी चित्रपट सृष्टीतील दोन ख्यातनाम अभिनेते. दोघांच्या वयात अवघे साडेचार वर्षांचे अंतर पण तरीही त्यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांमधून ज्या भुमिका केल्या त्यात त्यांच्या वयात बहुतेकदा एका पिढीचे (व एकदा तर दोन पिढ्यांचे) अंतर दाखविले गेले आहे. नायक वि. खलनायक असा त्यांचा अनेक चित्रपटात सामना झाला आहेच. पण ज्यात ते एकमेकांच्या विरोधात नाहीत अशा चित्रपटांमधून त्यांनी खाली दिल्याप्रमाणे विविध प्रकारची नाती रंगविली आहेत. सासरा - जावई मामा - भाचा पिता - पुत्र याशिवाय एका चित्रपटात तर त्यांनी आजोबा - नातवाच्या भूमिकाही केल्या आहेत. त्यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांपैकी फक्त दोनच चित्रपटात ते दोघे साधारण एकाच वयाचे व एकमेकांचे जवळचे मित्र दाखविले आहेत. (त्यातही एका चित्रपटात पुढे एकजण दुसर्‍याच्या बहिणीच्या प्रेमात पडतो व लग्न करतो म्हणजे त्यांनी जिजा-साला असे नाते रंगविले आहेच). तसे ते प्रत्यक्षातही चांगले मित्र आहेत व त्यापैकी एकाने दिग्दर्शनाचा प्रयत्न करताच दुसर्‍याने त्यात नायकाची भूमिका केली होती. हिन्दी चित्रपटातील हे दोन अभिनेते कोण? (हिंट - दोघांच्या नावाची आद्याक्षरे सारखी आहेत. अजून एक हिंट - दोघांच्या आडनावाची आद्याक्षरे देखील सारखीच आहेत. ) चित्रचक्कर क्रमांक ६ - एकाच नावाने प्रदर्शित झालेले दोन हिंदी चित्रपट. यातील पहिल्या चित्रपटात नायिकेची भूमिका करणा-या अभिनेत्रीच्या मुलीने दुस-या पण त्याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नायिकेची भूमिका केली आहे. दुस-या चित्रपटात काम करणा-या अभिनेत्रीची बहिण सध्या आघाडीची चित्रपटतारका आहे. एकाच नावाने प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांचं नाव काय? चित्रचक्कर क्रमांक ७ - एकाच नावाने निरनिराळ्या दशकांत प्रदर्शित झालेले तीन चित्रपट. तीनही चित्रपट मल्टीस्टारर, रहस्यप्रधान. पहिल्या चित्रपटाती नायक गुप्तहेर संघटनेचा अधिकारी. दुस-या चित्रपटातील नायकावर षड्यंत्राचा आरोप येतो, तर तिस-या चित्रपटात नायकच खुद्द खलनायक. या तीन चित्रपटांचं एकच असलेलं नाव काय? चित्रचक्कर क्रमांक ८ - एकाच नावाने निरनिराळ्या दशकांत प्रदर्शित झालेले दोन चित्रपट. यातील पहिल्या चित्रपटात नायकाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने दुस-या चित्रपटात चरित्र अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. हिंट - दोन्ही चित्रपटांत त्या काळच्या आघाडीच्या (ज्यांना सौंदर्यवती म्हणता येईल अशा) अभिनेत्रींनी नायिकेची भूमिका साकारली. पहिल्या चित्रपटातील नायिकेची त्या चित्रपटात दुहेरी भूमिका होती. चित्रचक्कर क्रमांक ९ - या चित्रपटातील नायक एका जोडप्याला भेटतो आणि त्या दोघांचे आयुष्यच बदलून टाकतो. त्याच्या मदतीने प्रथम त्या जोडप्यातील पती अमाप यश व प्रसिद्धी मिळवितो आणि नंतर पत्नी देखील नायकाच्याच मदतीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोचते. दरम्यानच्या काळात ते जोडपे विभक्त होते तर नायक तुरूंगात जातो. तुरूंगातुन सुटून आल्यावर नायक त्या जोडप्या हून ही अधिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कीर्ती व प्रसिद्धी मिळवितो पण त्याची किंमत त्याला स्वत:च्या मृत्युने चुकवावी लागते. हा चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १०: ओळखा पाहू - एकाच नावाचे चार चित्रपट पहिल्यात दोन नायक एक नायिका असा त्रिकोण दुसर्‍यात असा त्रिकोण नाही पण नायकाची पत्नी आणि नायिकेचा प्रियकर (होय प्रियकरच कारण त्यांचं लग्न झालेलं नसतं त्यामुळे नवरा म्हणता येत नाही) यांचा मृत्यू झालेला.. तिसर्‍यात पुन्हा त्रिकोण पण यात दोन नायिका आणि एक नायक चौथ्यात पुन्हा त्रिकोण आणि यातही दोन नायिका आणि एक नायक काय असेल या चारही हिन्दी चित्रपटांचं एकच शीर्षक? चित्रचक्कर क्रमांक ११: ओळखा पाहू - तीन नायक, तीन नायिका आणि चित्रपटाच्या शीर्षकात एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द असा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १२: ओळखा पाहू - या अभिनेत्रीने वेगवेगळ्या चित्रपटांमधून हिन्दी चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्यांच्या (जे की वास्तव जीवनात एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत) नायिकेचे काम केले आहे. त्याशिवाय यापैकी सर्वात मोठ्या भावाच्या तीन पुत्रांपैकी पहिल्या दोघांचीही नायिका ती बनली आहे. ही अभिनेत्री कोण? हे चित्रपट कोणते? चित्रचक्कर क्रमांक १३: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक कलेची साधना करण्याबाबत अजिबात मेहनती नाही, सदाचारी नाही (थोडक्यात अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध आहेत) याउलट सहनायक (जो पुढे परिस्थितीवश खलनायक ही बनतो) कलेचा साधक असून अतिशय मेहनती आहे, स्त्रियांच्या बाबतीत त्याचे पाऊल चुकूनही घसरत नाही. इतकं असूनही कलेतलं यश आणि नायिका हे दोन्ही नायकाच्या पदरात पडतं असा हा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १४: ओळखा पाहू - अतिशय गाजलेल्या व प्रचंड प्रमाणात व्यावसायिक यश मिळविणार्‍या या चित्रपटात खलनायक एकदा नायकाच्या वडिलांना व्यवसायात फसवितो त्यानंतर माफी मागतो. माफी मागताना त्याच्या कडेवर त्याची धाकटी मुलगी असते आणि सोबत मोठी मुलगी उभी असते. खलनायक तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिची शपथ घेत नायकाच्या वडिलांना पुन्हा फसविणार नाही अशी ग्वाही देतो आणि पुन्हा त्यांच्या व्यवसायात सामील होतो. लवकरच आपण घेतलेली आपल्या मुलीची शपथ खोटी ठरवत तो परत एकदा नायकाच्या वडिलांना फसवून त्यांचा व्यवसाय हडप करतो. ही फसवणूक जास्तच मोठी असते आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत नायकाचे वडील आणि त्याची धाकटी बहीण यांचा अंत होतो तर त्याची आई मानसिक रीत्या खचून जाते. कालांतराने नायक खलनायकाचा सूड उगवितो त्यावेळी खलनायकाने त्याच्या ज्या मोठ्या मुलीची खोटी शपथ घेतलेली असते तिचा खून करतो. हा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १५: ओळखा पाहू - एक अतिशय वेगळ्या प्रकारचा भूतपट. अतिशय स्वच्छ, सभ्य आणि शालीन. कुठेही अश्लील, ओंगळवाणी दृश्य नाहीत, उलट ही एका अर्थी अत्यूच्च दर्जाची प्रेमकथाच आहे. एका घरात राहणारं कुटुंब परक्या जगातील लोकांना घाबरतंय असं जाणवतं. चित्रपटाच्या शेवटी आपल्याला कळतं की (म्हणजे प्रेक्षकांपैकी सगळ्यांनाच हे कळतं असं नाही. अनेकांना चित्रपटाचा शेवट समजावून सांगावा लागतो. त्यामुळेच चित्रपट एका आठवड्यात चित्रपटगृहातून गायब झाला. असो.) घाबरणारं ते कुटुंबच भूत असून ते ज्यांना घाबरतं तीच जिवंत माणसं आहेत. चित्रचक्कर क्रमांक १६: ओळखा पाहू - नायिका आणि नायकाचा मित्र नायकाला फसवतात. पुढे तो अपघातात मृत्यू पावल्याचं त्यांना कळल्याने निर्धास्तपणे एकत्र येतात. पण तो जिवंतच असतो आणि कालांतराने नायिकेच्या व आपल्या मित्राच्या समोर येतो. या कथेवर बनलेले हे दोन चित्रपट. दोन्ही चित्रपटात वेगवेगळ्या काळातील अभिनय सम्राटांनी नायकाचे काम केले पण खलनायकाची भूमिका एकाच अभिनेत्याने केलेले हे दोन्ही चित्रपट तुम्हाला ओळखता येतील काय? चित्रचक्कर क्रमांक १७: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक आणि सहनायक एकमेकांच्या विरोधी स्वभावाचे. नायक आपल्या कामाशी अतिशय एकनिष्ठ, निर्व्यसनी, पैशापेक्षा तत्वांना अधिक मोल देणारा असा तर सहनायक निपुण असूनही कामात लक्ष न देणारा, सदा व्यसनात बुडालेला, साधारण मध्यंतरापर्यंत हे असंच चित्र. मध्यंतरात एक खलनायक अवतरतो. खरं तर त्याला पाहुणा खलनायकच म्हणायला हवं कारण तो जेमतेम दहा मिनीटेच चित्रपटात हजेरी लावून जातो. पण या दहा मिनीटात ही तो आपला प्रभाव पाडतोच कारण त्यानंतर नायक अमुलाग्र बदलतो. पैशाच्या पाठीमागे लागतो तत्वांना कवडीचीही किंमत देत नाही. इकडे सहनायक मात्र सुधारतो. अर्थात चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात हा सुधारलेला सहनायक, बिघडलेल्या नायकाचे डोळे उघडतो आणि मग शेवटी नायकही पुन्हा सद्वर्तनी होतो. हा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १८: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक प्रचंड प्रमाणात पझेसिव्ह. आपल्या एखाद्या गोष्टीवर इतरांनी हक्क दाखवावा हे त्याला अजिबात मान्य होत नाही. याच स्वभावामुळे बालपणी आपल्या आवडत्या बाहुलीला मित्राने हात लावला म्हणून मित्राशी मारामारी करणारा व परिणामी त्याच्या मृत्यूला कारणीभूत होणारा हा नायक पुढे तरूणपणी आपली नायिका आपल्या पासून दुरावतेय आणि आपल्या मित्राला (हा दुसरा - तरूणपणीचा मित्र, बालपणीचा मित्र त्याचवेळी मेला) जाऊन मिळतेय असे वाटून पुन्हा एकदा हिंस्त्र होतो. पण यावेळी हा मित्र मरत नाही तर नायकच पाण्याच्या प्रवाहात सापडून बेपत्ता होतो. काही काळानंतर पुन्हा येतो पण आता त्याच्या मनाचा संशय धुवून निघालेला असतो (बहुधा पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम). नायिकेकडे आणि आपल्या मित्राकडे स्वच्छ नजरेने पाहू लागतो आणि शेवट गोSSSड होतो. हा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक १९: ओळखा पाहू - अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट. दोन नायक व दोन नायिका असल्या तरी चित्रपटात एक प्रेमत्रिकोण आहेच. चित्रपटात हिंसा अगदी हातभर म्हणजे दोन्ही नायिका वेगवेगळ्या प्रसंगात एका पात्राच्या थोबाडीत ठेऊन देतात एवढीच...तरीही चित्रपट दणक्यात चालला. सगळी गाणी सुपरहिट आणि मुख्य म्हणजे चित्रपटाच्या शीर्षकात जो शब्द वापरला आहे तो प्रत्येक गाण्यात देखील (म्हणजे धृवपदात जमला नाही तर निदान एखाद्या कडव्यात तरी) वापरला गेला आहेच. चित्रचक्कर क्रमांक २०: ओळखा पाहू - अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट. ज्यात नायक व नायिका दोघे खोटे बोलतात. असे असले तरी दोघांच्या खोटे बोलण्यात काही महत्वाचे फरक आहेत. १. प्रथम नायिका नायकाच्या संबंधित इतरांशी खोटे बोलते, पण ती नायकाशी खोटे बोलत नाही. २. नंतर नायक नायिकेशी स्वत:शी संबंधित खोटे बोलतो. ३. याशिवाय नायिका नायकाविषयी इतरांकडे खोटे बोलल्याचे नायकाला कळते पण नायक जे नायिकेशी खोटे बोलतो ते तिला कधीच कळत नाही. चित्रपटाच्या शेवटी देखील नाही. चित्रचक्कर क्रमांक २१: ओळखा पाहू - हट्टी, दुराग्रही आणि विक्षिप्त स्वभावाचे नायक एकमेकांना भेटतात, एकमेकांशी चांगलाच संघर्ष करतात आणि शेवटी त्यांना कळून चुकते की आपण दोघेही एकाच प्रतीचे ’चक्रम’ आहोत म्हणून मग ते शेवटी संघर्ष सोडून एकत्र येतात तेव्हा त्यांना आणखी एक सत्य कळते त्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आहे आणि तो दिवस तोच असतो ज्या एका दिवसाचाच घटनाक्रम संपूर्ण चित्रपटात दाखविला आहे. हा हिन्दी चित्रपट कोणता? चित्रचक्कर क्र. २२ - ह्या सिनेमात एक प्रथितयश कलाकार होता. सिनेमात ४ मुख्य खलनायक आहेत. नायकाच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मग बलात्कार आणि खून. सरळमार्गी नायक एक एक करून सगळ्या खलनायकांचा काटा काढतो! चित्रचक्कर क्रमांक २३: म्हैसूर ते मुंबई पर्यंतचा बंगळुरू मार्गे एक अपूर्ण प्रवास. ज्या प्रवासा दरम्यान प्रेक्षकांना पुर्वसूत्र (Flash Back) तंत्राने कळते की चित्रपटाच्या एका नायिकेचा आधीच मृत्यू झालाय आणि नंतर चित्रपट संपता संपता चित्रपटाची दुसरी नायिका ही मरण पावते. नायक त्या दोघींचे चेहरे डोळ्यासमोर आणून जेमतेम दोन टिपं त्या दोघींसाठी गाळतो आणि पुन्हा आपला प्रवास मुंबईच्या दिशेने चालु करतो. इथे चित्रपट संपतो.. ओळखू शकाल काय? यातील वीस चित्रचक्कर मी रचले असून, चित्रचक्कर क्रमांक ७ व ८ कांचन कराई यांनी तर चित्रचक्कर क्रमांक २२ विद्याधर भिसे यांनी रचले आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 15554
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by चेतन सुभाष गुगळे

कितने पास कितने दूर (जुना) का? कितने दूर कितने पास अशा गाण्याने १२३४ १४३२ ची अटही पूर्ण होतेय.

In reply to by नगरीनिरंजन

चार शब्दांचे नाव आहे आणि शीर्षकगीतात तेच चार शब्द आलटून आले आहेत असं म्हटलंय ना. नाहीतर मी मंजिल सुचवणार होतो. त्यातच आहे ना ते रिमझिम गिरे सावन.. पण चार शब्दी नाहीच.

In reply to by गवि

चार शब्दांचे नाव आहे आणि शीर्षकगीतात तेच चार शब्द आलटून आले आहेत असं म्हटलंय ना.
अक्षर अन शब्द यात गल्लत होते आहे काय, गवि??? आ गले लग जा..... लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो.....

In reply to by वपाडाव

चार शब्दच म्हटले आहे. चार अक्षरे असतील १२३४ आणि तीच गाण्यात १४३२ क्रमाने येत असतील असे पटत नाही. म्हणजे अनामिका नाव आणि अकामिना असा शब्द असलेले शीर्षकगीत अशासारखे होईल.

In reply to by वपाडाव

गगनविहारी म्हणतात ते बरोबर आहे. चार सुटे सुटे शब्द आहेत, शीर्षकात त्यांचा जो क्रम आहे आणि शीर्षकगीतात जो क्रम आहे त्यात थोडा फरक आहे, एवढी हींट वाचून आजची तरूण पिढी देखील हे उत्तर सहज देऊ शकेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

जर ते बरोबर म्हणत आहेत तर महबुबा, मासुम अन बडे दिलवाला ही उत्तरे कशी काय शक्य आहेत...... (उत्तरे चुक आहेत हे मान्य आहे पण ती तर्कात / अटीत बसत नाहीत...)

In reply to by वपाडाव

चार सुटे सुटे शब्द आहेत, शीर्षकात त्यांचा जो क्रम आहे आणि शीर्षकगीतात जो क्रम आहे त्यात थोडा फरक आहे, >> या संदर्भातच ते विधान आहे. बाकी त्यांनी सूचविलेली उत्तरं चूकलेली च आहे. प्रश्न बरोबर कळूनही इतकी भिन्न उत्तरे त्यांनी का दिलीत हे मलाही समजलेले नाहीये.

येस चेतन ब्याक ..... मस्तच लेख रे... सोलिड धमाल येईल , चित्रपट ओळखायला.. पण सध्या कामात असल्याने असा रिकामटेकडेपण करायला अजिबात वेळ नाही.. ज्यांना वेळ असेल ते करतीलच.. मी रात्री घरी गेल्यावर प्रयत्न करतो... बाकी तुझ्या शैलीचा मी फ्यान आहेच .. हे वेगळे सांगायची गरज नाही :)

१२ नंबर हेमा मालिनी राज कपूर- सपनोंका सौदागर शम्मी कपूर - अंदाज शशीकपूर- अभिनेत्री रणधीर कपूर- चाचा भतीजा ऋषीकपूर - सदियां

In reply to by नितिन थत्ते

नीतू सिंग सुद्धा रोचक आहे. तिने शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषीकपूर सोबत कामे केली आहेत. परवरीशमध्ये शम्मीकपूर होता पण तिचा नायक नव्हता.

In reply to by वपाडाव

पागल व दीवाना शब्दाचा अर्थ सारखाच असला तरी आवारा शब्दाचा अर्थ वेगळा होतोय, म्हणून हे उत्तर बरोबर नाही. तीनही शब्द सारख्याच अर्थाचे असलेले शीर्षक शोधा.

गडबडीत आहे, पण विषय आवडल्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरत नाही - १. मुघल-ए-आझम ७. आंखें १०. अंदाज १५. द अदर्स

कल्पना आवडली रे गुगळे. :) मोकळा होताच सहभाग घेतल्या जाईल.. जरा कुठले चित्रचक्कर बाकी राहिलेत ते अपडेट करत गेलास तर बर पडेल.

मेरे यार कि शादि है?

In reply to by एक तारा

दोन्ही नायिका वेगवेगळ्या प्रसंगात एका पात्राच्या थोबाडीत ठेऊन देतात एवढीच >> असं मेरे यार की शादी है मध्ये घडत नाही.

१६ - दो अन्जाने आणि दास्तान दो अन्जाने: अमिताभ रेखा प्रेम चोप्रा दास्तान दिलीप कुमार (खरोखरचा डबल रोले. दुसर्‍या हीरोची नायिका बहुधा शर्मिला टागोर) बिंदु प्रेम चोप्रा

In reply to by मृत्युन्जय

दोन्ही नायिका वेगवेगळ्या प्रसंगात एका पात्राच्या थोबाडीत ठेऊन देतात एवढीच >> असं दिल तो पागल है मध्ये घडत नाही.

In reply to by मृत्युन्जय

फोडलंस....... तोडलंस............ मोडलंस........... की रे जया !!!! चार-चार वुत्तरे अन तीन ब्रोब्बर.....

गुगळे साहेब, तुम्हीसुद्धा ? आजवर तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या कल्पनेने तुम्हाला पटेल - रुचेल ते लिहित होतात आणि म्हणून आम्हाला आवडत होतात. आज तुम्ही तुमच्यातल्या लेखकाचा गळा घोटून लोकांना आवडेल ते लिहायला लागला आहात, हे पाहून खिन्नता झाली. लोकांना आवडेल ते देणे अथवा लिहिणे ह्यात चूक असे काहीच नाही पण तुम्हाला ते करताना बघवत नाही हो. एका मनस्वी लेखकाने असे मार्ग चोखाळावेत हे खटकले. तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

@ प्रसाद, इथे मी जे काही प्रकाशित करतोय ते सारं काही माझं जुनंच लेखन आहे. ही चित्रपट कोडी देखील त्याला अपवाद नाहीत. गेल्या वीस वर्षांपासून मी माझ्या मित्रांना (शाळा, कॉलेज, नोकरी / व्यवसायातील सहकारी) अशा प्रकारची कोडी घालत आहे. आम्ही हे खुप चांगल्या पद्धतीने enjoy करतो. महाजालाचा वापर वाढल्यावर आभासी मित्रांबरोबरही हे सारे share करत आलो आहे. आता इथे प्रकाशित केलेली कोडी देखील गेल्या वर्षीच टंकलिखीत करून महाजालावर (दुसर्‍या संकेतस्थळावर) मित्रांसोबत share केली गेली आहेत. म्हणूनच यातील तीन कोडी दुसर्‍या सभासदांनी बनविलेली आहेत (तसा उल्लेख मी आधीच केलेला आहे). फक्त अशा प्रकारचे लेखन मिसळपाव वर प्रकाशित केले जाते का हे मला ठाऊक नव्हते. कानसेन प्रकाशित झाल्यावर अशा प्रकारचे लेखन इथे प्रसिद्ध करता येईल असे मला वाटले आणि मी ते केले. याचा अर्थ तुम्ही आजवर तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या कल्पनेने तुम्हाला पटेल - रुचेल ते लिहित होतात आणि म्हणून आम्हाला आवडत होतात. आज तुम्ही तुमच्यातल्या लेखकाचा गळा घोटून लोकांना आवडेल ते लिहायला लागला आहात, हे पाहून खिन्नता झाली. >> असा काढलात? तुमच्या अशा प्रकारे अर्थ काढण्याने देखील तुम्ही मला (माझ्यात मूळात नसलेले) दोन सद्गुणच चिटकवले आहेत. १. मी लोकांची अतिशय काळजी करतो (I care for people चे भाषांतर) आणि त्यांना जसे आवडेल तसे देतो. २. इतक्या झटपट (कानसेन प्रसिद्ध होवून दोनेक दिवस झाल्यावर) मी वीस कोडी बनवू शकलो म्हणजे मी किती गतिमान आहे. इतके खिन्न असूनदेखील तुम्ही या चित्रचक्करमधील सर्वात अवघड प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहे. या बद्दल अभिनंदन. अवांतर : तुम्ही सध्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले लिखाण मी केवळ नजरेखालून घातले आहे. निवांत वेळ मिळाला की वाचेन. त्यामुळे सध्या तिथे काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीय. असे असूनदेखील तुम्ही माझ्या धाग्यावर आवर्जून वेळ काढून प्रतिक्रिया देता याबद्दल आभार. गैरसमज झाला नसेल (किंवा झाला असल्यास आता दूर झाला असेल) अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

आतापर्यंतचे निकालः १. मुघल - ए आझम ----------------- रण्गोपा २. ३. राम लखन ------------------------- मानस ४. ५. अनिल कपूर, अनुपम खेर --------- गवि ६. हसिना मान जायेगी --------------- मानस ७. आँखे -------------------------------- नगरीनिरंजन ८. ९. गाइड -------------------------------- नगरीनिरंजन १०. अंदाज ----------------------------- रण्गोपा ११. प्यार इश्क और मोहब्बत -------- वपाडाव १२. हेमा मालिनी ---------------------- थत्ते चाचा १३. लंडन ड्रीम्स ----------------------- मृत्युन्जय १४. बाजीगर -------------------------- जाई साहित्ययात्री १५. हम कौन है ----------------------- गवि १६. दो अंजाने, दास्तान --------------- मृत्युन्जय १७. १८. १९. २०. गझनी ----------------------------- मृत्युन्जय २१. टॅक्सी नं. ९२११ ------------------- गवि २२. २३. वरील समरी केवळ गुगळ्यांच्या बरोबर चुक उत्तरांवर आधारीत. उत्तरे आमच्याकडुन तपासल्या गेलेली नाहीत. :)

In reply to by मृत्युन्जय

अचूक उत्तरे देणार्‍या सर्वांचे अभिनंदन. प्रयत्न करणार्‍या इतर सर्वांचे देखील आभार. मृत्युन्जय, तुम्ही स्वत: देखील हे महाजालावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे तपासू शकता. केवळ मी चूक / बरोबर म्हणतो म्हणून असे विधान करण्यात अर्थ नाही. मेहनत घेऊन निकाल बनविल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

@ प्रसाद, याचे उत्तर द्यायला अनेकांनी बरेच प्रयत्न केले परंतू ते त्यांना साधले नाही. आपण एकाच प्रयत्नात अगदी अचूक उत्तर दिले याबद्दल आपले अभिनंदन. इतरांकरिता तपशील वार स्पष्टीकरण चित्रचक्कर क्रमांक २ चे उत्तर - चित्रपटाचा नायक प्रशांत बालपणी आपली लहान बहीण जसबीरचा रूसवा काढण्याकरिता जे गाणे म्हणतो त्याकरिता त्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे. या गाण्यातली फक्त एक ओळ या बहीण भावांचे वडील म्हणतात. या ओळी साठी वेगळा गायक न वापरता पडद्या वर ही भूमिका साकारणारे अभिनेते किशोर साहू यांनीच ’डॆडीका मम्मीका सबका कहना है...’ ही ओळ गायली आहे. हाच नायक प्रशांत पुढे मोठा झाल्यावर (अभिनेता देव आनंद) आपल्या वाट चुकलेल्या बहिणीला (झीनत अमान) आवाहन करतो तेव्हा चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात प्रसंगानुरूप बदललेल्या कडव्यांसह ’फुलोंका तारोंका सबका कहना है.. एक हजारोंमें मेरी बहना है’ हे गाणे चित्रपटात पुन्हा येते ते किशोरकुमारच्या आवाजात. चित्रपटाचे नाव ’हरे राम हरे कृष्ण’ असे असले तरी ’दम मारो दम’ या शब्दांशी यमक जुळवून घेताना शीर्षक गीतात या शब्दांचा क्रम ’हरे कृष्ण हरे राम’ असा ठेवण्यात आला आहे.

आयला पब्लिक दणादण उत्तर देवू ऱ्हायली ना राव. अपुन के लिये कूच छोडा कि नय ?

In reply to by स्मिता.

चूक चित्रचक्कर क्रमांक २२ करिता काही हिंट्स (विद्याधर भिसे यांच्या सौजन्याने) सिनेमात नायकाचा बाप पोलिसात असतो! नायक हमाल असतो. आता पुन्हा शोध घ्या.

चित्रचक्कर क्रमांक ९ - गाईड चित्रचक्कर क्रमांक १८: संगम चित्रचक्कर क्रमांक १४: बाजीगर

In reply to by विजुभाऊ

९ व १४ ची उत्तरे बरोबर असली तरी आधीच प्रकाशित झाली आहेत. १८ चे आपण दिलेले उत्तर चूकीचे आहे. यावरून एक जुना परकीय विनोद आठवला:- एका नेत्याच्या भाषणावर टिपण्णी करताना वृत्तपत्राच्या संपादकाने लिहीले - "त्यांच्या भाषणात सत्य व नाविन्याचा समावेश होता. फक्त जे सत्य होते त्यात नाविन्य नव्हते आणि ज्यात नाविन्य होते ते सत्य नव्हते."

कांती शाह ची अजरामर कलाक्रुती : २२. गुंडा

दादा, किशोर साहुंचा आवाझ नाहीय तो, तो आवाज आहे,राहुल देवबर्मन ह्यांचा!

२३- हिरा पन्ना

१९) धडकन - एकदम बरोबर उत्तर...एक नंबर च्वॉईस...
१) मुघल-ए-आझम ७) आंखे १०) अंदाज १४) बाजीगर २०) गझनी २१) taxi नंबर९२११
या आधीच देउन झाले आहेत...

In reply to by वपाडाव

अरे मी आधी खालची उत्तरे न वाचता जितके जमले तितके सोडवले. मग पाहिले तर हा एक प्रश्न सोडून बाकी सगळे आधीच इतरांनी सोडवून झालेले होते. पण मग टंकलेले फुकट गेले असते ना, म्हणून तसेच ठेवले. :-)

चित्रचक्कर कर्त्यांनो, आता सगळी उत्तरे द्यावीत, ही विनंती... नविन चित्रचक्करं देऊ द्या, प्लीज.

मी एक अ‍ॅड करतो. असा एक चित्रपट ज्यात अगदी प्रमुख नायिका , मेन हिरॉईन, वरच बलात्कार होतो (नेहमीप्रमाणे नुसता झटापटयुक्त प्रयत्न नव्हे..पूर्ण..) आणि तरीही तिला आत्महत्या करताना किंवा दु:खी कुढत जीवन जगताना दाखवलेले नाही, उलट त्यानंतरही नायकाने तिच्या प्रेमात पडणे आणि अन्य सर्व गोष्टी नेहमीसारख्या आहेत. हिंट. नायक या सिनेमापर्यंत जरा "जून" झालेला आहे. नायकाचा काकाही सिनेमात आहेच.

In reply to by गवि

उत्तर : प्रेमग्रंथ - माधुरी दिक्षित, ऋषीकपूर आणि शम्मीकपूर यांनी काम केले होते.. (या चित्रपटाचा दिग्दर्शक : राजीव कपूर (रा.ते.गं.मै. चा हिरो )

हमारा दिल आपके पास है - अनिल कपूर, ऐश्वर्या राय, जॉनी, ई.ई. नायकाचा काकाही सिनेमात आहेच. ---ही तळटिप वाचाया विसरलो.... नाहीतर कथा दोहोंचीही सारखीच आहे....

चित्रचक्कर क्रमांक १ चे उत्तर - ’मुगल ए आझम’ यात सम्राट अकबराचा विवाह जोधा या हिन्दु स्त्री बरोबर झालेला असून ही तो सलीमच्या अनारकलीवरील प्रेमाला, ती स्वधर्मातील असली तरी निम्न सामाजिक स्तरातील असल्यामुळे विरोध करतो असे दाखविले आहे. चित्रचक्कर क्रमांक २ चे उत्तर - चित्रपटाचा नायक प्रशांत बालपणी आपली लहान बहीण जसबीरचा रूसवा काढण्याकरिता जे गाणे म्हणतो त्याकरिता त्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे. या गाण्यातली फक्त एक ओळ या बहीण भावांचे वडील म्हणतात. या ओळी साठी वेगळा गायक न वापरता पडद्या वर ही भूमिका साकारणारे अभिनेते किशोर साहू यांनीच ’डॆडीका मम्मीका सबका कहना है...’ ही ओळ गायली आहे. हाच नायक प्रशांत पुढे मोठा झाल्यावर (अभिनेता देव आनंद) आपल्या वाट चुकलेल्या बहिणीला (झीनत अमान) आवाहन करतो तेव्हा चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात प्रसंगानुरूप बदललेल्या कडव्यांसह ’फुलोंका तारोंका सबका कहना है.. एक हजारोंमें मेरी बहना है’ हे गाणे चित्रपटात पुन्हा येते ते किशोरकुमारच्या आवाजात. चित्रपटाचे नाव ’हरे राम हरे कृष्ण’ असे असले तरी ’दम मारो दम’ या शब्दांशी यमक जुळवून घेताना शीर्षक गीतात या शब्दांचा क्रम ’हरे कृष्ण हरे राम’ असा ठेवण्यात आला आहे. चित्रचक्कर क्रमांक ३ - राम लखन चित्रचक्कर क्रमांक ४ चे उत्तर - गॊडफादर च्या कथेशी बर्‍यापैकी साम्य दर्शविणार्‍या ’फुल और कांटे’ या चित्रपटात गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. अशाच एका संघर्षात अमरीश पुरी कडून प्रतिस्पर्धी टोळीतील सुरेश चटवालचा मुलगा मारला जातो. तेव्हा त्याला अमरिश पुरी विरुद्ध अजुन भडकविण्यासाठी रझा मुराद च्या तोंडी हा शोले मधील प्रसिद्ध संवाद टाकण्यात आला आहे. चित्रचक्कर क्रमांक ५ चे उत्तर - कर्मा, रुप की रानी चोरोंका राजा, जिंदगी एक जुआ अशा चित्रपटांमधून नायक वि. खलनायक असा सामना रंगविणारे हे दोन अभिनेते, सासरा - जावई (तेजाब, जिंदगी एक जुआ, लाडला, १९४२ ए लव्ह स्टोरी, राम लखन), मामा - भाचा (राम लखन, खेल), पिता - पुत्र (हम आपके दिल में रहते है) अशा रुपात देखील प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. दीवना मस्ताना या चित्रपटात नायिकेला पटविण्यात अनिल कपूरचा प्रतिस्पर्धी असलेल्या गोविंदाच्या वडिलांची भूमिकाही अनुपम खेर ने केली आहे. या शिवाय विजय चित्रपटात अनुपम खेर च्या नातवाची भूमिका अनिल कपूर ने केली आहे. लम्हे व परिंदा या दोनच चित्रपटात ते समवयस्क दाखविले असून एकमेकांचे मित्र आहेत. अनुपम खेरच्या दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात (ओम जय जगदीश) अनिल कपुर ने नायकाची भूमिका केली होती. आता या दोघांचे पुढच्या पिढीतील वारसदार (सिकंदर खेर व सोनम कपूर) देखील चित्रपटातून कामे करीत आहेत. परंतू त्यांनी एकत्र काम केल्याचे अजुन तरी ऐकिवात नाही. चित्रचक्कर क्रमांक ६ - ’हसीना मान जायेगी’ नावाच्या चित्रपटात १९६८ मध्ये बबीताने काम केले होते नंतर याच नावाने आलेल्या चित्रपटात करिष्मा कपूर ने १९९९ मध्ये काम केले आणि आता तिची बहीण करिना आघाडीची अभिनेत्री आहे चित्रचक्कर ७ चे उत्तर - चित्रपटाचे नाव "ऑंखे". पहिला चित्रपट १९६८ ला प्रदर्शित झाला. यात धर्मेंद्र नायक होता. दुसरा चित्रपट १९९३ ला प्रदर्शित झाला. यात गोविंदा नायक होता. तिसरा चित्रपट २००२ ला प्रदर्शित झाला. यात अमिताभ बच्चन नायक/खलनायक होता. चित्रचक्कर क्रमांक ८ - गुरू. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा नायक होता मिथुन चक्रवर्ती आणि नायिका श्रीदेवी तर २००७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा नायक होता अभिषेक बच्चन आणि नायिका ऐश्वर्या राय बच्चन. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनीही माणिकदास गुप्ता ही व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रचक्कर क्रमांक ९ - Guide चित्रचक्कर क्रमांक १० - अंदाज़ चित्रचक्कर क्रमांक ११ - प्यार इश्क और मोहब्बत! चित्रचक्कर क्रमांक १२ - हेमामालिनी राज कपूर - सपनों का सौदागर शम्मी कपूर - अंदाज शशी कपूर - दो और दो पॉंच, हम तेरे आशिक है, इ.इ. राज कपूरचे मुलगे: रणधीर कपूर - हाथ की सफाई ऋषी कपूर - एक चादर मैली सी चित्रचक्कर क्रमांक १३ - लंडन ड्रीम्स चित्रचक्कर क्रमांक १४ - बाजीगर चित्रचक्कर क्रमांक १५ - हम कौन है? (मूळ आवृत्ती - द आदर्स) चित्रचक्कर क्रमांक १६ - दास्तान आणि दो अन्जाने चित्रचक्कर क्रमांक १७ - देव आनंद आणि विजय आनंदचा ’तेरे मेरे सपने’ चित्रचक्कर क्रमांक १८ - आदमी (दिलीपकुमार, मनोजकुमार, वहिदा रहमान, सिमी गरेवाल, पद्मा चव्हाण) चित्रचक्कर क्रमांक १९ - धडकन चित्रचक्कर क्रमांक २० - घजिनी चित्रचक्कर क्रमांक २१ - टॅक्सी नंबर ९२११ चित्रचक्कर क्र. २२ - गुंडा (१९९८) प्रमुख भूमिका मिथून चक्रवर्ती चित्रचक्कर क्रमांक २३ - हीरा पन्ना