Skip to main content

'गोड' बर्फी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 14/09/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जाणकार परीक्षण टाकतीलच, पण.. योगायोगाने आज अचानक मनात विचार आला की बरेच दिवसात चित्रपट पाहिला नाही, तर आज एखादा टाकावा. रोज दूरचित्रवाणीवर पाहिल्या जाणार्‍या प्रोमो'झ मुळे बर्फीबद्दल मनात उत्सुकता होतीच, म्हणून गेलो. पिक्चर छान जमला आहे.. अंजाना अंजानी च्या अनुभवामुळे मनात थोडी धाकधूक होती, आणि ते आला बर्फी गाणे पाहताना अस वाटायलाही लागले होते.. पण नन्तर हलकेफुलके विनोद, मध्येच काही बोलके प्रसंग यातून मध्यंतर कधी झाले ते कळलेच नाही.

आवडणारे ब्लॉग्स

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 07/09/2012 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरती गाण्यांचे धागे खूप येऊन गेले आहेत. अमकी अमकी गाणी आवडतात,वेडावतात वगैरे. पण कोणत्या साईटस्/ब्लॉग्स मिपाकरांना आवडतात आणि का याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझ्या आवडनिवडीत, ब्लॉग्सच्या यादीत ही भर पडेल - हे मुख्य. :-D माझी आवडते ब्लॉग्स सांगते. मला पुढील साईट्स्/ब्लॉग्स नितांत आवडतात - (१) http://www.psychologytoday.com/ मानसशास्त्रावर आधारीत लेखांचा हा एक फार मोठा खजिनाच आहे. यातही अनेक विभाग आहेत - आनंद, आरोग्य, निराशा, लैंगिकता, राजकारण , झोप वगैरे.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

खजुराहो

लेखक अन्या दातार यांनी बुधवार, 29/08/2012 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे. खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली.

लबाड सभ्य

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 25/08/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.