Skip to main content

कथा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 03/12/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

आकाश

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 03/12/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,'आकाशचे पप्पा त्याला म्हणाले, ' हो का?

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.

'आधारा' ची रात्र

लेखक विशाल चंदाले यांनी बुधवार, 27/11/2013 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..." "तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..." "येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..." म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती. म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली.

ब्रम्हदेवाची पृथ्वी

लेखक सचीन यांनी बुधवार, 27/11/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपली हजारो वर्षाची झोप पूर्ण करून ब्रह्मदेव नुकतेच उठले होते.ब्रह्मदेव जागे झाल्याची बातमी जशी त्रिलोकात पसरली, तसे त्यांना भेटायला देवगण हे ब्रह्मलोकात जमा झाले.जग बनवण्याच्या कामात अत्यंत श्रम पडल्याने त्यांनी हि हजारो वर्ष झोप घेतली होती. सर्व देवांचे ब्रह्मलोकात स्वागत करून ब्रह्मदेवाने विचारले,”अरे शक्तिशाली देवानो तुम्ही चिंतेत दिसताय, त्याचे कारण काय?” यावर नारदमुनी म्हणाले, “ ब्रह्माजी, तुम्ही तुमचीं सुंदर रचना पृथ्वी बनवली आणि झोपायला गेलात .इथे त्रास मात्र आम्ही भोगतोय. यावर ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले ‘कसला त्रास, मला काही कळेल का ?इतके झालय तरी काय.

वेडा गणू

लेखक सचीन यांनी मंगळवार, 26/11/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
गजाअण्णांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून ज्योतिषी महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर गजाभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा गणू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का? मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्या कडे चांगले दहा हजार खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही ज्योतिष लोक, म्हणजे पृथ्वीवरचे सर्वज्ञच हो. "ते मरू द्या,तुमचे कीर्तन. मला आमच्या गणूची झकास पैकी कुंडली काढून द्या.

स्त्रियांचे राज्य

लेखक सचीन यांनी सोमवार, 25/11/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काळ झपाट्याने बदलत चालला होता बघता बघता ३००० वे साल उजाडले. ह्या एवढ्या वर्षात बरेच बदल झाले होते.आपल्या भारतात आता स्त्रियांचे राज्य आले होते.सर्व प्रमुख पदांवर स्त्रिया कार्यरत होत्या. पुरुषांनी त्यांच्यावर हजारो वर्षापासून केलेल्या अत्याचारांची सव्याज भरपाई करत होत्या. गायात्रीबाई ह्या देशाच्या मुख्य होत्या. त्या अत्यंत सनातनी वृत्तीच्या होत्या.त्यांनी सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषांची पंचाईत करून ठेवली होती. ‘वंशाचा दिवा’ हि पुरुषांची पदवी जाऊन त्या एवजी ‘वंशाची टूबलाईट’ हि नवी पदवी स्त्रियांना मिळाली होती.

सांजवेळ

लेखक सचीन यांनी रविवार, 24/11/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत. आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व. शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे.

ज्याचे करावे भले.....

लेखक सचीन यांनी शनिवार, 23/11/2013 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे.