Skip to main content

आस्वाद

आनंद - कार्लसन डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 19/11/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार? पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल? कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस? चला बघूयात गेम ८.

डोंबिवली दिवाळी कट्टा वृत्तांत

लेखक नानबा यांनी मंगळवार, 19/11/2013 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज होणार, उद्या होणार, होणार की नाही अशा अनेक विषयांमुळे बराच चर्चिलेला डोंबिवली दिवाळी कट्टा अखेर झालाच. वृत्तांत वाचून कट्ट्याचा आनंद घेऊ इच्छीणा-या आणि काही कारणास्तव येण्याचे मनात असूनसुद्धा येऊ न शकलेल्या तमाम मिपाकरांसाठी हा वृत्तांत.. अखेरच्या क्षणापर्यंत कट्टेकरी मंडळींची पक्की संख्या तळ्यात मळ्यात होती. माननीय चोळेगावकर श्री. स्पा यांनी आधीच नकार कळवला होता, तर रविवार रात्रीची वेळ असल्यामुळे डोंबिवली बाहेरील अनेकांनी येणं टाळलं. साधारण ५ जणांचा होकार आल्यामुळे दुपारीच नंदी पॅलेसमध्ये फ़ोन करून टेबल रिझर्व्ह करून ठेवलं होतं.

आनंद - कार्लसन डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 18/11/2013 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत.

जॉनी मॅड डॉग

लेखक निनाद यांनी सोमवार, 18/11/2013 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
जॉनी मॅड डॉग आफ्रिकेतल्या एका देशात यादवी छेडली गेली आहे. एका गावावर हल्ला होतो आहे. हल्ला करणारे सैनिक हे अगदी १२ ते १५ वर्षांचे दिसताहेत. त्यांचा एक कमांडर मोठा दिसतो आहे. प्रत्येक घरातले सगळे लोक शिव्या घालून बंदुकीच्या जोरावर तुडवून बाहेर काढले जातात. गावाच्या चौकात एकत्र केले जातात. काही लोक दयेची याचना करत असतात. जे जास्त बोलतात ते लक्ष वेधून घेतात. एका क्षणात निवाडा होतो - गोळ्या अगदी सहजतेने चालतात. अशी चौकशी आणि निवाडा चाललेला असतानाच एका लहान दहा वर्षाच्या मुलाला पुढे आणले जाते. त्याचा बाप म्हणतो त्याला सोडा यात मुले कशाला? सैनिकातला एक जण विचारतो तुझा कोण तो?

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 16/11/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुलछडी-
या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो...

आनंद - कार्लसन डाव ६

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 16/11/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार? आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते. चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे?

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.