Skip to main content

आस्वाद

प्रेम आणि ममता....... भाग एक

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 14/12/2013 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
लाल साडी घातलेली लता आपल्या पाच वर्षाचा मुलगा राजुला हाताला धरुन ती भराभरा जात होती,राजुच्या पायात ते चप्पल मोठे आसल्याने तो आडखळत चालत होता.तरी ही तो आई बरोबर चालण्याचा प्रयत्न करीत होता,त्याला भिती होती की आईचा हात सुटेल व तो हारवेल,आता त्याला घर ही माहीत नव्हते.लहानपणापसुनच आनेक समस्यानी त्याला घेरले होते. लता एका गल्लीतुन दुसर्या गल्लीत जात होती,कोणी ओळखीचेतर पाहणार नाही ना याबाबत ती दक्ष होती, चालत चालत ती सुनसान गल्लीत पोहचली, तेथे कोणी ही नव्हते, मग ती पाठीमागे आपल्या कोणी येत तर नाही ना हे पाहिले व पुन्हा डोक्यावर पदर घेऊन चालु लागली. राजुला आई कोठे जात आहे माहीत नव्हते.त्याला नेहमी वा

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 13/12/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

काळ्या किनारीचे सोनेरी पान

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 10/12/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास हा जेत्यांनी, राज्यकर्त्यांनी लिहिलेला असतो. त्यामुळे जेत्यांना नसलेले गुण चिकटवण्यात आणि पराभूतांना नसलेले दुर्गुण चिकटवण्यात इतिहासकारांचे बरेच श्रम खर्ची पडतात. त्यातून जर जेते वा राज्यकर्ते संकुचित, कोत्या, प्रतिगामी विचारांचे असतील तर विचारायलाच नको. राजकारणातील दबाव हे देखील एक कारण असू शकते. आधुनिक इतिहासकारांना मात्र लोकशाहीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे अकबराच्या तथाकथित नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फझलसारख्या तथाकथित इतिहासकारांची भाष्ये विश्वासार्ह अशा ऐतिहासिक पुराव्यांवर तपासून घेण्याची वेळ आलेली आहे असे काही मान्यवरांचे मत आहे.

गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath

लेखक प्रास यांनी रविवार, 08/12/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच.

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय - नेताजींचे सहवासात भाग २ .. भाग 2 प्रस्तावना - ... पु. ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकाचा मुकुटमणी आहे प्रकरण १० हे. त्यात बाबत प्रस्तावनेत तिखट उल्लेख आहे. ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही.

नेताजींचे सहवासात

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/12/2013 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
नेताजींचे सहवासात 1 कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो.

एक आठवण / ती

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 03/12/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता. पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते, वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो.

कथा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 03/12/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

आकाश

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 03/12/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,'आकाशचे पप्पा त्याला म्हणाले, ' हो का?

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.