Skip to main content

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

आय लव्ह यू........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/02/2014 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : http://misalpav.com/comment/551311#comment-551311 ( पिवळा डांबीस काकाने प्रेरीत केलं त्यामुळे लिहायला घेतलं) फेब्रुवारी असूनही आज आकाश ढगाळलंय. कुंद म्हणता येणार नाही पण प्रफुल्लीत एकदम उत्साही. असं वातावरण असलं की कसं भाग्य फिदा असतं अशावेळेला दुधात साखर म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट ने मीटींगची डेट पोस्टपोन केलेली असावी.

छायागीत ४ - मुड मुडके ना देख मुड मुडके...

लेखक Atul Thakur यांनी गुरुवार, 06/02/2014 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मीमंदिरात नेतो म्हणुन जुगाराच्या क्लबात नर्गीसला आणणारा राजकपुर नेमका नादिराच्या हातात सापडतो. आणि ती थंडपणे त्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगु लागते. निरागस नर्गीस या अपरीचित वातावरणात अजुन सावरलेली देखिल नसते की कुणीतरी जबरदस्तीने तिच्याशी हात मिळवतात तर कुणी ओळख करुन घ्यायला पाहतात. "श्री ४२०" मात्र तेथेही नर्गीस कुठल्याशा गावाची राजकुमारी आहे अशी थाप ठोकायला मागेपुढे पाहात नाहीत. नादीरा मात्र आता अशी मागे हटणार नसते.

जीवती

लेखक रामदास यांनी गुरुवार, 06/02/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग २

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 05/02/2014 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी येथे राजयोगासाठी पातंजल योगसूत्र आणि हठयोगासाठी हठप्रदीपिका व घेरंडसंहीता असे एकूण तीन ग्रंथ विचारार्थ घेतले आहेत. शिवसंहीता, गोरक्षसंहीता व इतर अनेक उपनिषदे जरी योगविषयाला वाहिलेली असली तरी वरील तीन ग्रंथ हे राजयोग, हठयोगासाठी सर्वसमावेशक आहेत. जो काही फरक यांत व इतर ग्रंथांत असेल तो काही तांत्रिक तपशिलांवर असेल. सूत्रबद्ध मांडणी हे प्राचीन संस्कृत ग्रंथांचं वैशिष्ट्य. ही सूत्र लहानशीच असतात मात्र यांत प्रचंड अर्थ लपलेला असतो. अधिकारी माणसं त्यावर भाष्य करुन सर्वसामान्यांसाठी तो अर्थ विशद करतात. याच परंपरागत पद्धतीत पातंजल योगसूत्राचा समावेश होतो.

हर दिल जो प्यार करेगा

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 04/02/2014 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही ‘कहो ना प्यार है’ यामधील ‘एक पल का जीना’ या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते.

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

अठरा श्लोकी मराठी गीता

लेखक खेडूत यांनी रविवार, 26/01/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत असणे आणि अर्थ सुद्धा समजत असणे हे फारच विशेष आहे. कांही जणांना ती पूर्ण पाठ असते. तसेच माझ्या आईला पण संपूर्ण गीता पाठ आहे. तेही साठ वर्षांपासून! मला संस्कृत येत नाही याचे नेहमी वाईट वाटते. पुढे कधी तरी नक्की करायच्या गोष्टीत संस्कृत शिकणे सर्वांत पहिले आहे. आमच्या गावातल्या शाळेत संस्कृत हा विषय माझ्या ब्याच पासून बंद झाला, कारण म्हणे संस्कृत शिक्षकांचा तुटवडा. हे खरे नसावे असे वाटते कारण आमच्या शाळेतल्या तांबोळी नावाच्या मुस्लिम बाई संस्कृत मध्ये एम ए होत्या आणि त्याना हिंदी शिकवावे लागे म्हणून त्याना वाईट वाटे!

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 26/01/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते.

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.