Skip to main content

अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 16/02/2014 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
films हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी.

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

लेखक रमताराम यांनी रविवार, 16/02/2014 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची, आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची, विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही, तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही, खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती, सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी, दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात, काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड.

आय लव्ह यू (३)......

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/02/2014 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966 आय लव्ह यू (२).... http://misalpav.com/node/27011
ढगाळलेल्या आकाशात सोनेरी सूर्य प्रकाश पडलाय. एकाच वेळेस सोळासतरा इंद्रधनुष्ये दिसायला लागलीत गेटजवळचा गुलमोहोर बहरुन फुललाय . प्राजक्त पांढर्‍या फुलांचे चांदणे ल्यायलाय. सोनचाफ्याच्या फुलांचा सडा पडला असावा असा उत्फुल्ल सुगंध दरवळतोय. सकाळनगरचे गेट फुलांनी मढवून टाकयला हवे. आनंदाने मला पिसे लागेल असे वाटतय. मला रश्मीला कडकडुन मिठी माराविशी वाटतेय.

देव आनंद

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 15/02/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

कै. भाऊसाहेब पाटणकर

लेखक शरद यांनी शनिवार, 15/02/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरील लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी भाउसाहेबांचा पहिला शेर-ओ-शायरीच्या वाचनाचा कार्यक्रम पुण्यात साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. प्रा. क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. आम्ही २५-३० ऐकावयास. काय बहार आली. सर्वजण मंत्रमुग्ध. पण वाहवा म्हणावयास आम्ही पोरेच. थोडे ज्येष्ठ खुश होते पण दाद देण्यास थोडे मागेच. लगेच दुसर्‍या दिवशी शोधून "मराठी शायरी" मिळवळी. बहुतेक दुकानदारांना पुस्तकाचे नावच माहीत नव्हते.. वाचून झाल्यावर लगेच परत जाऊन १२ रु. खर्च केले व ४ प्रती विकत घेऊन मित्रांना वाटल्या. नच तरी माझी प्रत नाहिशी होणार होतीच.

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 14/02/2014 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.

आय लव्ह यू (२)......

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/02/2014 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा: आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966 रश्मीचा अचानक फोन आला आणि मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या......... पुढे.
"ओक्के..... शुअर... बाय..... " अन तेच ते मस्त जीवघेणे स्माईल..... गोखले मास्तरांच्या क्लासमधे आज वसंत फूललाय. मस्त श्रावण बरसतोय....... शरदाचे चांदणे पसरलय. गोखलेसर " एच एफ ई./ एच आय ई, थॅरिस्टर , झीनर ब्रेकडाऊन करंट , करंट लिमीट " हे शिकवण्या ऐवजी ऐवजी एक बोट नाचवत "देवा कीती सुंदर आकाश सुंदर चांदणे चंद्र देई.सुंदर प्रकाश सूर्य देतो" शिकवताहेत. क्लास संपला.....

काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :) तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्‍या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले.

एम अँड दी बिग हूम

लेखक धन्या यांनी मंगळवार, 11/02/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
em ही आहे एक इंग्रजी कादंबरी. लेखनाचा ढाचा कादंबरीचा आहे म्हणून कादंबरी म्हणायची.

काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्‍या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो. शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन!