Skip to main content

हितगुज नातवाचे

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 18/05/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी

दुस्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/05/2014 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.

तुम बीन जाऊं कहां...

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 12/05/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 02/05/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

ओव्या

लेखक मालविका यांनी बुधवार, 30/04/2014 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची .

केंद्र परिघाचं नातं

लेखक आतिवास यांनी बुधवार, 30/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.

रसीक बलमा..

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 28/04/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे. रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते. गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 25/04/2014 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.