उमड घुमड ...
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी.
थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे.
आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.
मिसळपाव
तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.
(