Skip to main content

बाउन्सर्स आणि यॉर्कर्स

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 22/07/2014 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा. पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात.

क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग १

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 21/07/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना- ही कलाकृती संपूर्ण पणे गायला अवघड आहे . यात आलापी तान , सरगम हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत . त्याच बरोबर तुमच्या आवाजाच्या रेंज ची परीक्षा पाहाणारी ही कव्वाली आहे. तरीही मी ठरविले आपण ही गायचा प्रयत्न करायचा. माझ्या संग्रही ही कव्वाली आहे. पण त्यातील वेगवान गायकी मुळे " अल्फांस " ( शब्द ) उचारण्यात अडचण येत असे म्हणून आंजावर शीध घेतला तर एकाने याचा भावानुवाद कम शब्दानुवाद इंग्लीश मधे केलेला आढळला. मग मला वाटले आपणजी मिपाच्या वाचकांसाठी हा प्रयत्न मराठीत करून पहावा.

दिपिका

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 20/07/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
'मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस?,' 'का?सांग ना का?,' 'कारण......कारण......मी.....

CID ची गोष्ट !

लेखक पामर यांनी रविवार, 13/07/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले किती तरी दिवस(सॉरी, वर्ष आणि दररोज दुपारी) मुंबई पोलिसांकडे प्रचंड म्हणजे प्रचंड काम असल्याने अनेक महत्वाच्या cases सोनी चॅनलनी ह्या CID कडे सोपवल्या आहेत हे सर्वांना माहीत आहेच.(हेच हो आपले खुन, अपहरण वगैरे..)आपले सर्वांचे लाडके A.C.P. प्रद्युम्न (काय त्यांचे डोळे,काय त्यांचे टक्कल,काय त्यांचा ३ piece suit ...वा जवाब नाही!

चित्रवीणा

लेखक मितान यांनी गुरुवार, 10/07/2014 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 09/07/2014 22:36 या दिवशी प्रकाशित केले.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

बुक स्टाँल

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 06/07/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त. त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केस

कहां गये वो लोग?--मंग्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/07/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत

'चर्निंग ऑफ द सिटी' (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी बुधवार, 02/07/2014 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!) ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली? आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे. ‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे.