मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्द कथा -विषकन्या

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती. च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले. च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला. किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर. आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘

विषकन्या’

.

वाचने 4130 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा Mon, 06/23/2014 - 16:12
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन" रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला

योगी९०० Mon, 06/23/2014 - 12:32
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ याऐवजी आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’ हे कसे वाटते???

तिमा Sat, 06/28/2014 - 09:56
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.

In reply to by तिमा

प्रभाकर पेठकर Sat, 06/28/2014 - 12:26
>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.

योगविवेक गुरुवार, 07/03/2014 - 16:51
विवेक नमस्कार, कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.