सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना
सर्वांना राम राम! नुकताच किन्नौर- स्पीति सायकल प्रवास केला. त्याविषयी आता सविस्तर लिहिण्यास सुरुवात करतो आहे. प्रत्येक सायकल प्रवास खूप काही शिकवून जातो, समृद्ध करून जातो. ह्या सायकल मोहीमेमध्येही खूप काही शिकायला मिळालं. एका प्रकारे स्पीतिमध्ये सायकल चालवण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. हा सायकल प्रवास फक्त सायकलिंग नसून त्याला एक सामाजिक उद्दिष्ट होतं. आरोग्य, फिटनेस, पर्यावरण ह्याविषयी जागरूकतेसंदर्भात संदेश आणि वेगवेगळ्या लोकांसोबत व गटांसोबत बोलणं हासुद्धा त्याचा एक भाग होता.