Skip to main content

अजनी, एपी आणि ती उडी

लेखक महामाया यांनी गुरुवार, 19/05/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दारा जवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...! आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं...! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर...! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच.

राजाराम सीताराम एक ----------------भाग १७ - मुंबईचा मित्र

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

फुलपाखरू

लेखक पथिक यांनी मंगळवार, 17/05/2016 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या सुटीत मुर्तीजापुरला (माझं सासर) गेलो होतो. एक दिवस एकटाच गावाबाहेरच्या पुंडलिक बाबांच्या मठाकडे चालत निघालो. गावाबाहेर पडलो तोच मागनं एक अनोळखी आवाज आला, "काका, मी सोबत येऊ का ?" बघितलं तर ८-९ वर्षांचा, मळके कपडे घातलेला, स्वत्तःहि धुळीने माखलेला एक मुलगा होता. त्यालाही त्या मठात जायचं होतं आणि त्या १० मिनिटांच्या वाटेतही त्याला सोबत हवी होती; मग ती माझ्यासारख्या अनोळखी, पस्तिशीतल्या माणसाची का असेना ! वाटेत त्याची सारखी बडबड सुरु होती. नाव देवा. आई मजुरी करते. वडील नाही. भाऊ नाही. शाळेत जातो. त्याने मला वाटेत कितीतरी गोष्टी मी न विचारताच सांगितल्या.

बोलाचा हापूस!

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 16/05/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही विषयावर अखंड बोलणाऱ्या आणि तुम्हाला बोलण्याची अजिबात संधी न देणाऱ्या व्यक्तीच्या तावडीत तुम्ही कधी सापडला आहात काय? सध्या माझे ग्रह जरा पेंगुळलेले असल्याने माझ्या आयुष्यात असे दुर्मिळ योग वारंवार येत आहेत. माझे ग्रह तसे ही अर्धोन्मिलीत अवस्थेत एखाद्या मवाल्यासारखे कुठेतरी भटकत असतात हा मुद्दा वेगळा! जेव्हा नितांत गरज असते तेव्हा माझे ग्रह कुठे उलथलेले असतात कोण जाणे. बाबा पुता करून एकाला पकडून आणावे तर आधी आणून ठेवलेले पसार झालेले असतात. असो. तर सध्या अशा बोलून बोलून समोरच्याला नामोहरम करणाऱ्या बोलर लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे.

विसराळूपणाचा आणि होणाऱ्या चुकांचा कंटाळा आलाय.

लेखक गोंडस बाळ यांनी शनिवार, 14/05/2016 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी खूप विसराळू माणूस आहे. अनेक गोष्टी मी हमखास विसरतो. फोन/इंटरनेट ची बिल भरण्यापासून ते अगदी ऑफिसमधली टाईम शीट भरेपर्यंत अनेक गोष्टी आहेत .. शिवाय कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी विसरत राहतो. अगदी बायकोने फोन केला, येताना अमुक एक गोष्ट घेऊन या तरी मी अक्षरशः ती घोकत घोकत गाडी चालवतो. मध्येच traffic मध्ये अडकलो तर ते सुद्धा विसरतो. पुन्हा घरी आल्यावर मला अशी अपूर्ण कामे करायला परत जावे लागते. त्यातून कटकटी होतात, भांडण होतात. काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या पत्नीला काही जबाबदाऱ्या घे म्हटले तर तिच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”

लेखक पथिक यांनी गुरुवार, 12/05/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्याला (माझं शहर) आलो कि मी नं चुकता शहरातल्या त्या भागात फिरायला जातो जिकडे शहरातले मोठे मार्केट, भाजी बाजार आणि बरीच दाट वस्ती आहे. हिंदू, मुसलमान, सिंधी, मारवाडी असे प्रामुख्याने काही ना काही व्यवसाय करणारे लोक तिकडे राहतात. तिकडली दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, होटेलं, लोकांची गर्दी, गोंगाट, खरेदी-विक्रीची, जाणाऱ्या-येणाऱ्यांची गडबड, ई सगळं फिरून फिरून, त्या गर्दीत मिसळून पाहायला फार आवडतं मला.

Confession Box : अंतीम भाग .... थ्री इडिअट क्वेस्चन

लेखक मार्मिक गोडसे यांनी मंगळवार, 10/05/2016 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ मागील तीन दिवसात माझ्या सामान्यज्ञानात बरीच भर पडली होती. वर्गातील विद्यार्थी दिवसभर अभ्यासाव्यतिरीक्त दुसरे काहीही करत नव्ह्ते. डबा खाऊन झाल्यावर उरलेल्या वेळात राजकारणापासून क्रीडा, अर्थ ई. विविध विषयापर्यंत चर्चा करत असत. मीही माझ्या कुवतीप्रमाणे सहभाग घ्यायचो,परंतू ही मुले माझ्यापासून थोडे अंतर ठेवून होती. बहुतेक परवा डबा खाताना झालेला प्रसंग कारणीभूत असावा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लास असल्यामुळे मीही दुसर्‍या दिवशी डबा आणला होता.

गड्या... परदेस पन बरा...!!!

लेखक घाटी फ्लेमिंगो यांनी मंगळवार, 10/05/2016 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज येक वरिस झालं बगता बगता... हिकडं ईवुन... जवा कळालं व्हतं की परदेशात नोकरीधंद्याला जावं लागनार तवा पन इस्वास बसला नव्हता... अन आता पन तशिच गत झालीया... मानूस म्हंजे एक ठिपका हाये असं देवळातलं आन्ना म्हनले व्हते... पन त्याच्या जिवणात जर अशी वर्स ठिपक्यावानी पटा-पटा जाऊ लागली तर कवा म्हातारपन आलं समजनार पन न्हाई...!! येक वर्सात लै नवी लोकं भेटली... नवं मित्र जालं... लै ठिकानी फिरुनशान आलू... लै फोटू काडलं... येकीकडं बायका-पोरास्न सोडून आल्याचं दुख होतं पन नव्या ठिकानी जाऊन आल्याचा आनंद पन व्हता...! ज्या गोर्या लोकास्नी लांबूनच बगत व्हतॊ त्यांच्याच देशात नव्हं...

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 09/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

यशस्वी माघार

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/05/2016 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
1 . खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे...