Skip to main content

गणित प्रज्ञा आणि पेढे!

लेखक रुपी यांनी बुधवार, 20/07/2016 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सारख्या तुझ्या मुलांच्या परीक्षा!" आजोबा आईकडे तक्रार करत होते. झालं असं होतं, की मेच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मामेबहिणीचं लग्न होतं. आईच्या लग्नानंतर तिच्या माहेरी पहिलंच लग्न. ती सगळ्या भावंडांत लहान त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी! त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, साहजिकच तिने लग्नाच्या बरेच दिवस आधीपासून माहेरी यावे अशी आजी-आजोबांची इच्छा होती. पण माझ्या चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचं कारण आलं. आईच्या माहेरी तेव्हा तरी असल्या(!) बाहेरच्या परीक्षेंचे कुणाला महत्त्व नव्हते - खरे तर फारसे अभ्यासाचेच महत्त्व नव्हते. आजोबांसाठी तर ते अगदीच फुटकळ कारण.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

बोट – Girl In Every Port

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 19/07/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते! वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात.

ओल्या मातीच्या कुशीत

लेखक जागु यांनी गुरुवार, 14/07/2016 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या सरी येऊन जमिनीला भिडल्या, की बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागतात. पाऊस आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं असतं. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात ते काळ्या ढगांची, गार गार वार्‍याची, मातीला सुगंध देणार्‍या, बी-बियाणांचे मातृत्व स्वीकारणार्‍या पहिल्या सरीची. पावसाचे आगमन आपल्या शेतांमध्ये होणार म्हणून आम्ही मे महिन्यापासूनच वर्षाऋतूच्या स्वागताच्या तयारीला लागायचो.

कोडमंत्र

लेखक तिमा यांनी सोमवार, 11/07/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालच 'कोडमंत्र' हे मराठी नाटक पाहिले. 'ए फ्यु गुड मेन' या अमेरिकन नाटकावर ते आधारित आहे, हे सुरवातीलाच सांगितले. हेच नाटक गुजराती रंगमंचावरही चालू आहे. लष्करी शिस्त ही कधीकधी कशी अतिरेकी होऊ शकते , हे या नाटकांत फार चांगल्या तर्‍हेने दाखवण्यांत आले आहे. लष्करातील अनेक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत येत नाहीत आणि लष्करी गुपिते शत्रुच्या हाती पडू नयेत, या दृष्टीने ते बर्‍याचवेळा आवश्यकही असते. पण कधीकधी अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यालाही होतो आणि मग ते निस्तरताना तो कोणाचा तरी बळी देतो. रवी शेलार हा मराठा रेजिमेंटचा एक जवान असतो.

कमाई

लेखक सुंड्या यांनी सोमवार, 11/07/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विचारपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय- मी २०१३ मध्ये हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करत होतो, जून मधल्या एका रात्रीच्या शिफ्टमधे एका फ्लाईटमधून आलेल्या संयुक्त संस्थानातल्या प्रवाश्यांचे इमीग्रेशन-इन क्लिअर करणे चालू होते.

ठहरने को बोला है

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 08/07/2016 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

काजूकतलीची गोष्ट

लेखक हृषिकेश पांडकर यांनी मंगळवार, 05/07/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
सहामाही परीक्षांचे निकाल जे लागायचे ते लागून गेले होते.शाळेतील आणि घरातील वातावरण आता निवळले होते.प्रगती पुस्तकावर पालकांची सही करून पुन्हा ती शाळेत पोहोचली होती.थोडक्यात काय तर सहली,स्पोर्ट्स आणि स्नेहसंमेलन सुरू होण्याअगोदर असलेला विसावा आम्ही अनुभवत होतो.ऑक्टोबरचा शेवट असल्याने शाळेचे स्वेटर घालायचे दिवस चालू होते.शनिवारी असलेली सकाळची शाळा नकोशी झाली होती.अर्थात शाळा नकोशी होण्यापेक्षाही सकाळचे उठणे असह्य होत होते.कारण शाळा नकोशी व्हावी अशी वेळच कधी आयुष्यात आली नव्हती. सातवीत होतो त्यामुळे अजूनही हाफ चड्डीचा गणवेश होता.पुढच्या इयत्तेपासून म्हणजे आठवीपासून पूर्ण चड्डी असायची.सक

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.