Skip to main content

माझी ज्यूरी ड्यूटी ४

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 05/04/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग बचावपक्षाच्या वकिलाने निवड प्रक्रियेत असा एक प्रश्न विचारला होता की "ह्या खटल्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित मुद्दे उपस्थित होऊ शकतात. हा व्यवसाय राज्यात बेकायदा मानला जातो. तुम्हापैकी कुणाला धर्म वा अन्य श्रद्धेमुळे ह्या व्यवसायाविरुद्ध काही आक्षेप असतील तर सांगा". इथे कुणी आक्षेप घेतला नाही. पण खटल्यात काय होणार ह्याची एक अंधुक कल्पना आली. सकाळी कोर्टात हजर झालो.पहिले काही दिवस कोर्ट कधीही वेळेवर सुरु झाले नाही. कधी १५ मिनिटे उशीर तर कधी अर्धा तास. आता आम्ही पुढच्या भागात येऊन बसलो. प्रेक्षकांकरता असणारा कक्ष बराचसा रिकामा.

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 04/04/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.

सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

लेखक मार्गी यांनी सोमवार, 04/04/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 02/04/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

लेखक उल्का यांनी शुक्रवार, 01/04/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, घरची राखण करणारा वगैरे वगैरे…’ तर असा हा कुत्रा माझाही खूप आवडता होता. खरे तर माझ्या बाबांचा तो खूप प्रिय प्राणी! त्यांना आमच्या घरात ‘कुत्रा आमचा पाळीव प्राणी’ असे म्हणायला एक आणायचा पण होता. परंतु माझी आई ठाम होती की दोन पायांच्या मानव प्राण्याशिवाय घरात कोणालाही प्रवेश नाही. अपवाद पाल आणि झुरळ असावेत. कधीतरी चिमणी पण यायची. पण ते स्वमर्जीने येत व जात. आईला त्याचा त्रास नव्हता.

माझी ज्यूरी ड्युटी ३

लेखक शेंडेनक्षत्र यांनी शुक्रवार, 01/04/2016 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग आधीच्या भागात एक तपशील राहिला. प्रत्येक उमेदवार ज्युररला साक्षीदारांची यादी दिली होती. जर त्यातले कुणी ओळखीचे असतील तर हात उंचावून तसे सांगायचे होते. ह्या यादीत बलात्कारित स्त्रीही होती. पण कायद्याप्रमाणे तिचे आडनाव डो असे खोटेच ठेवले होते (अमेरिकेत ओळख न पटलेल्या पुरुषाला जॉन डो आणि स्त्रीला जेन डो असे म्हणण्याची पद्धत आहे. उदा. एखादा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तर. त्याला अनुसरून). कुणाही ज्युररने ह्यातले कुणी आपल्या ओळखीचे आहेत असे म्हटले नाही. आता दोघे वकील रिंगणात उतरले. पाहिली पाळी सरकारी वकिलाची होती.

जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

लेखक टुंड्रा यांनी गुरुवार, 31/03/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे. मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत.

बचपन के दिल भुला न देना .......१

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 30/03/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
बचपन के दिन भुला न देना आज हसे कल रूला न देना ------------------------- एक सामान्य लेख बालपणाच्या आठवणीवर लिहित आहे. बालपणीच्या आठवणी हा निश्चितच प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा असतो. मग मी त्याला अपवाद कसा? आज नोकरी , ऑडीट ,मिटींग अप्रैजल अशा रुक्ष गोष्टीनी आपल जग व्यापून गेले असताना या आठवणी निश्चितच आपल्याला एक सुखद गारवा देउन जातात. प्राथमिक शाळेत असतानाचे वय म्हणजे , आई बाबांच्या लाडात तसेच तितक्याशा महत्त्वाच्या नसलेल्या शाळेत (त्या काळी ८० च्या दशकात) बागडण्याचे दिवस.

माझी ज्यूरी ड्युटी २

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 29/03/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
इथून पुढे चालू आमच्या कोर्टाचा पुकारा होताच आम्ही सगळे हळूहळू कोर्टात हजर झालो. दारात एक कडक चेहर्याची पोलिसाच्या वेषातली कृष्णवर्णीय स्त्री होती. ती शेरीफ असल्याचे कळले. त्या बाईने होतकरू ज्युररांच्या यादीत प्रत्येकाचे नाव पाहून मगच त्यांना बसायची अनुमती दिली. एक म्हातारा ज्यूरर होता त्याने डोक्यावर टोपी घातली होती ती त्याला काढायला लावली. थंडीचे दिवस होते. म्हातारा म्हणाला की त्याला थंडी वाजते आहे म्हणून तो टोपी घालून आला आहे पण कोर्टाचा नियम असल्यामुळे त्याला टोपी काढणे भाग पडले.