Skip to main content

सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 29/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 29/04/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h… ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.

पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 28/04/2016 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते.

सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 26/04/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 25/04/2016 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही?

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 22/04/2016 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद. या पुणे विभागाच्या अनुदिनी गटाच्या अभिनव प्रयोगाची पावले मिसळपाव.कॉम, मायबोली.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम या मराठी संकेतस्थळावरही या निमित्ताने पडली हे विशेष. या सर्व संकेतस्थळांवरही या प्रयत्नाचे चांगले कौतुक झाले. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातूनही या अनुदिनीच्या लिंक्स सर्वत्र फिरत होत्या हे या अभिनव ध्वनी अनुदिनीचे यशच म्हणावे लागेल.

असा ही एक क्लायंट

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 20/04/2016 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला. कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते.

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/04/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

माझी ज्यूरी ड्युटी ७

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 19/04/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ त्या बाईच्या महत्त्वपूर्ण साक्षीत दुभाष्यामुळे काही वेळा घोटाळे होत. जिथे गुन्ह्याला सुरवात झाल्याचा आरोप होता तो बार हा मुख्यतः मेक्सिकन व दक्षिण अमेरिकेतील लोकांमधे लोकप्रिय होता. पीडित स्त्री तिथे बार टेंडर म्हणून काम करत होती. आरोपीचा वकील तिच्या मागील नोकर्‍यांबद्दल विचारत असताना तिने दोन वर्षे ह्या बारमधे काम केल्याचे सांगितले. पण दुभाष्या बाईने त्या बारच्या नावाचा अनुवाद केला. मूळ स्पेनिश नावाचा इंग्रजी अर्थ ऑफिस असा होता. त्यामुळे अनुवादित वाक्य "मग मी क्ष बारमधे काम करु लागले" ऐवजी "मग मी ऑफिसमधे काम करु लागले" असे बनले!