Skip to main content

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 18/04/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी.. HealthApps ‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.

प्रतापगड अनुभव

लेखक जिन्क्स यांनी रविवार, 17/04/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रात्री 'रात्रीस खेळ चाले' मालिका बघत होतो. एरवी ही मालिका फक्त मनोरंजन म्हणून पाहणारा मी पण मालिके मध्ये दाखविलेल्या काही प्रसंगांमुळे काही जुन्या आठवणी चाळवल्या. साल १९९९, स्थळ: प्रतापगड. ओळखीच्या गटा सोबत महाबळेश्वर ते प्रतापगड हा ट्रेक करत होतो. दुपारी जेवण करून महाबळेश्वरच्या बॉबे पॉइंट वरून निघून पारगाव - अफझलखान समाधी असे करत प्रतापगड वर पोचणे हा कार्यक्रम होता. अंतर साधारण १६ किमी ( ४ तास) . प्रतापगडच्या MTDC च्या रेस्टहाऊस मध्ये रात्रीच्या जेवणाची आणि राहण्याची आधीच सोय केलेली होती. ट्रेक मस्त चालू होता. काही नव्या ओळखी झाल्या होत्या. अंतर ही तसे फार दमवणारे नव्हते.

Confession Box : शकीरा..बहूरुपी आणि..... भाग १

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 15/04/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
कांदेपोहे खाताखाता टिव्हीवर म्युझिक चॅनलवरील गाणी बघत असताना दारावरची बेल वाजली. टिव्हीचा आवाज म्युट केला व दरवाजा उघडला. साहेब आहेत का? खाकी वर्दीतल्या व्यक्तीने विचारले. हो. - मी कोण आहे ? - बाबांनी विचारले. पोलिसकाका आहेत. - मी हातातील वर्तमानपत्र बाजुला ठेवून बाबा पटकन उठून दाराजवळ आले. आपल्या सोसायटीतील मैदानात कार्यक्रम करायचा आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीने आपली सही घेऊन यायला सांगितले आहे. - पोलिसकाका बाबांनी वाचून वहीत सही केली. ११ वाजता कार्यक्रम बघायला या असे आमंत्रण देऊन पोलिसकाका निघून गेले. बाबांनी दरवाजा बंद केला व आईला हाक मारून बोलावले.

माझी ज्युरी ड्यूटी ६

लेखक शेंडेनक्षत्र यांनी शुक्रवार, 15/04/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ पीडित महिलेची साक्ष बरीच मोठी होती. जवळपास प्रत्येक मोठ्या सुट्टीनंतर दुभाष्या बदलत असे. एकदा एक गंमतीदार दुभाष्या आला होता. अनुवाद करताना एखाद्या नटासारखे चेहर्यावरील हावभाव जिवंत असायचे. कधी खांदे उंच करून, भुवया उंचावून, डोळे मोठ्ठे करून आपले भाषांतर सादर करायचा. तमाम ज्युरी मंडळींची करमणूक होत होती. तो दुभाष्या गेल्यावर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे जसा दुभाष्या असे तसे त्या साक्षीदार बाईंचा उत्साह कमीजास्त होत असे. ह्या नटसम्राटाच्या वेळी तिच्या उत्तरात एक जोश होता. नंतर काही शांत दुभाषी आले.

माझी ज्यूरी ड्यूटी ५

लेखक शेंडेनक्षत्र यांनी बुधवार, 13/04/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ अमेरिकेतील कोर्टातील एक विचित्र जुनाट पद्धत म्हणजे जे काही कामकाज होते आहे ते एक लेखनिक अर्थात स्टेनोग्राफर लिहून घेत असतो. त्याला कोर्ट रिपोर्टर म्हणतात. अगदी शॉर्टहॅंड वापरले तरी तासनतास असे लिहिणे दमवणारे असणर. त्यामुळे कोर्टाचे कामकाज एक दीड तासापेक्षा जास्त सलग चालत नसे. जज छोटी का होईना पण सुट्टी देत असे. त्यामुळे ज्युरीचे काम फार दमवत नसे. अशी जुनी पद्धत आज अमेरिकेत का आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे. सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

शतशब्दकथा : दहशत!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/04/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच .

सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/04/2016 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

आमच्या मुलींचे पालक

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 07/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary. आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला. आता उत्तरार्ध. शुभदा छपाईची कामं करते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचं ऑफिस बंद होतं.

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 07/04/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!