Skip to main content

मी, किशोर कुमार आणि कराओके……

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 28/05/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.

बोर न्हाण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शनिवार, 28/05/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी. आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते.

कातरवेळ

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 26/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात.

माझी ज्यूरी ड्युटी - ९

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 24/05/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या. आरोपीच्या वकिलाने असे म्हणणे मांडले की आरोपीला विनाकारण गोवले आहे.

नस्त्या उचापती- 2

लेखक अन्नू यांनी मंगळवार, 24/05/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा दिवस. संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या मंतरलेल्या रात्री होत्या... काय सांगता राव...! हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या. कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे.

रेस...सिंहगड ते आयएटी पर्यंत...!

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पहिला मुंबई प्रवास-एक हाईस्कूल मधे असतांना मी शेजारच्या मुलांसोबत रोज पहाटे जॉगिंग करितां जायचो खरा...! तेव्हां कल्पना देखील नव्हती की पुढे मला सिंहगडापासून रेस करावी लागेल. बिलासपुरला वडील रेलवेत असल्यामुळे आम्ही रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग. त्यांच्या खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच.

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

मराठी ने समृद्ध केलं...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 19/05/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीशी जवळीक-साधल्यामुळेच मला जगातील सर्वोत्कृष्ट कृतींचा आनंद उपभोगता आला. काही गोष्टी आयुष्यांत कां घडतांत, याला तात्पुरतं जरी उत्तर नसलं तरी त्याचे दूरगामी परिणाम सुखद असतात. मी बघितलेला पहिला इंग्रजी चित्रपट व इंग्रजी नावेल दोन्हीं हिटलरशी संबंधित होते, हा योगायोग असेल. चित्रपट होता चार्ली चैप्लिनचा-‘दि ग्रेट डिक्टेटर’, नावेल-इर्विंग वेलेस चं ‘दि सेवंथ सीक्रेट’ प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. वयाच्या एका ठराविक टप्यावर ही आवड निर्माण होते. त्या वयात मला देखील शास्त्रीय संगीताची ओढ लागली. रेडियोवर मी मनमुराद मराठी-अमराठी गायक ऐकले. आज देखील खूपशा बंदिशी तोंडपाठ आहेत.