Skip to main content

अभियांत्रिकीचे दिवस-२

लेखक पाटिल यांनी सोमवार, 16/08/2021 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

आठवणीतील श्रावण - कहाणी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 12/08/2021 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं ! नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 4)

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 06/08/2021 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुढचा दिवस उजाडला. आज मामु चा दौरा होता. क्षणात अंतू बरवा आठवला. अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होती. चिपळूण मध्ये फक्त एक पेट्रोल पंप चालू होता. बाकी पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने बंद होते. चिपळूण ला येणारे रस्ते , घाट बंद झाल्याने पेट्रोल चे टँकर पण 3 4 दिवस येत नव्हते. त्यामुळे 3 ते 4 तास रांगेत उभे राहून फक्त 50 रुपयाचे पेट्रोल मिळत होते. त्यातही चारचाकी साठी नाहीच. मदतीला शेजारील गावांतून गाड्या घेऊन यायचं तरी पंचाईत व्हाययाची वेळ यायची. मुख्य चिपळूण शहरात साफसफाई साठी पाणीच उपलब्ध नव्हते. पिण्यासाठी पॅक बाटल्या मदत म्हणून येत होत्या.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 03/08/2021 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 2)

लेखक मालविका यांनी सोमवार, 02/08/2021 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
22 तारीख. सकाळी 10.30 ची भरती होऊन ओहोटी सुरू झाली. समुद्राच्या जवळ आणि खाडी असल्याने भरती ओहोटी च्या वेळी वाशिष्ठी मध्ये पण पाण्याचे चढ उतार नेहमी होत असतात. पाणी आता थोडं कमी होईल अशी आशा वाटत होती. पण डोळयांसमोर पावसाने भरलेले ढग दिसत होते. पाणी 2 फूट कमी झाल्याचे मेसेज आले. थोडं हायस वाटलं पण पाणी ज्या वेगात भरलं त्या वेगात कमी होत नव्हतं. खर तर ओहोटीच्या वेळी पाणी वेगाने उतारावरून धावत जावं तसं जात असत पण यावेळी बाहेर गेलेल्या पाण्याला आत घ्यायला नदी तयार नव्हती. त्यामुळे हे 2 फूट कमी झालेल पाणी फक्त एक खेळ होता हे लवकरच जाणवलं.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 1)

लेखक मालविका यांनी रविवार, 01/08/2021 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवातीलाच सांगते मी पूरग्रस्त नाही, पुरामुळे माझं कोणतंही नुकसान झालेलं नाही.आधी अप्रत्यक्षपणे आणि पुरानंतर मी प्रत्यक्ष यात सहभागी होते आणि त्याचाच हा अनुभव. तर माझं गाव चिपळूण. दर पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी भरणं ही अगदी वार्षिक कार्यक्रम असल्यासारखी गोष्ट. क्वचित थोडं कमी जास्त होत पाणी. पण त्यात विशेष वाटावं असं काही नाही इतकी त्याची सवय झालेली. आज मी 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते तेव्हापासून मला आठवतंय त्याप्रमाणे पावसाळ्यात पाणी भरल्याची सुट्टी मिळायची किंवा अर्ध्यातुन शाळा सोडून द्यायचे.

क्रेडीट कार्ड

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 31/07/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं. मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ८

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/07/2021 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध...

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!