Skip to main content

चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 30/06/2021 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.

जर्द काही जीवघेणे..!!

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 26/06/2021 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!! आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 19/06/2021 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही.

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग २

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी बुधवार, 02/06/2021 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
........'चंद्रभान' मायाला आणि आपल्या मुलाला द्यायला सासरी आला. सासऱ्याने जावयाचा खास पाहुणचार म्हणून गावरान कोंबडा कापला. 'रत्नाकर' हा मायाचा मामेभाऊ होता तो पण दारुडा होता. त्याने गावच्या 'मोहाची दारू' चंद्रभानला पाजली आणि नशेमध्ये धुंद झाल्या नंतर 'रत्नाकर' चंद्रभानला विचारू लागला, "काय भाऊजी तुमचं काही लफड-वफडं आहे का बाहेर कुठे? जाता की नाही बैठकीत! 'चंद्रभान' लगेच बरळायला लागला, "आहे ना! आपल्या सारख्या पैलवान गड्याची एकीवर थोडी हौस भागते. आहे 'चंपा' नावाची नाचणारी बाई!"रत्नाकर ने ही माहिती लगेच मायाला दिली.मायाला आधी संशय होता पण आता रत्नाकरने सांगितल्यानंतर पुष्टी झाली.

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग १

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी सोमवार, 31/05/2021 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
......... माया एक ग्रामीण भागातील एक चुणचुणीत अन् चाणाक्षं मुलगी! काळेभोर डोळे, बुटके नाक, लांब केश, सडपातळ बांधा, मध्यम उंची आणि गव्हाळ वर्णाची! तशी तर ती सुखवस्तू कुटुंबातली! घर छान वाड्या सारखे, वडील 'रामराव' गावचे सरपंच! तीस एकर बागायती शेती, नोकर-चाकर, घरी गोदामात धान्याच्या रासा भरलेल्या, मोटार पंप विहीर सर्वकाही सुव्यवस्थित होते. आठ भावंडांमधली 'माया' दुसर्‍या क्रमांकाची! लहानपणापासूनच ती सर्व भावंडांना सांभाळून घेत असे. मोठी बहीण 'छाया' ही नेहमी तिच्या अभ्यासात समरस असे. त्यामुळे घरातील सर्व कामे मायालाच करावी लागत. नोकर होते पण ते शेतातल्या कामासाठी! 'आई' होती पण ती सतत आजारी असायची.

वामकुक्षी की जाम कुक्षी?

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!) जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे.

मृत्यूचा दंश

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/05/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही. पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे.

लाँकडाऊन

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/05/2021 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकातील विसाव्या वर्षात लाँकडाऊन हा जुना सर्व सामान्यानां माहीती नसलेला शब्द प्रयोग बोलचालीचा झाला आणि घाटावरच्या " विसाव्या " चे वारंवार दर्शन घडवून गेला. आता "विसावा ", या शब्दाची एवढी भीती बसली आहे की चुकनही कोणी त्याचा उपयोग केला तर अंगावर काटे येतात. अशाच एका कडक लाँकडाऊन च्या दिवशी घरी बसुन कंटाळलो होतो म्हटंल चला जरा फेर फटका मारुन यावा. मी स्वताः बाहेर पडलो का नाही कारण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. पडू म्हणले तरी घरी बायको, मुले काँलोनीतले मीत्र, सिक्युरिटी स्टाफ आणी रोड वर पोलिसांचा कडक बंदोबस्त.करोनाची भीती ती वेगळीच.......

दप्तर..

लेखक विखि यांनी शुक्रवार, 07/05/2021 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
"जय आवरलं का रे, उशीर होतोय" शाळेचा डबा भरता भरता जयची आई किचन मधून ओरडल्याचा आव आणत होती. "अगं आई मी काय करू, या बुटाची लेस लागतच नाहीये" कितीतरी वेळ बुटाच्या नाडीत गुंतलेला जय वैतागला आणि बाजूलाच बसलेल्या वडिलांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागला. तशी वडिलांनी किंचित हसत त्याच्या बुटाची नाडी बांधायला घेतली "बाळराजे अजून किती दिवस तुम्हाला शिकवायचं हे" म्हणत जयच्या पाठीत एक मजेशीर धपाटा मारला.