कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास (ईशानच्या शब्दात)
माझा मुलगा ईशान (वय वर्षे १०)आणि भाची जुईली(वय वर्षे १२) यांनी कुंभार्ली घाट सायकलवरून सर केला . त्याचे वर्णन ईशानने लिहले आहे, तेच येथे देत आहे
कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास
एक दिवस एकदम सुरवातीला मी आणि बाबाने ठरवलं कि कुंभार्ली घाट आहे त्याच्या एकदम टोकापर्यंत जाऊन यायचं. त्याच्यासाठी मी, बाबा आणि माझी आई आम्ही ठरवत होतो कि आज जायचं, उद्या जायचं पण ते नाही जमलं. शेवटी तो एक दिवसआला. दिनांक ४/४/२०२१ रोजी मात्र करायचा ठरवलं. मग सकाळी ५.३०/६.००च्या दरम्यान उठलो व तयारीला लागलो.
मिसळपाव