Skip to main content

सेंडॉफ नंतरची शाळा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 30/01/2009 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमरः या लेखातली सगळी पात्रं खरीखुरी आहेत आणि सगळ्यांनी जरी चाळिशी ओलांडली असली तरी त्यांचा उल्लेख मुलं अथवा मुली असाच होईल. कोणाला आक्षेप असतिल तर ते आपल्या स्वतःकडेच ठेवावेत. आम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. :) *** साधारण ३-४ वर्षं झाली असतिल. रविवारचा दिवस होता. सकाळी साडेदहाचा सुमार असेल. दारावरची बेल वाजली. मीच दार उघडलं. एक वयस्क गृहस्थ दारात उभे होते. माझ्या वडिलांचे कागदोपत्री लावायचे नाव घेऊन ते घरात आहेत का अशी विचारणा झाली. मी साहजिकच त्यांना आत घेतले. तेवढ्यात बाबा पण बाहेर आले. पाहुणे म्हणाले, "काय रे? ओळखलंस का?".

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/01/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

Seezens (seasons)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली." मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ. "मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले. आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन.

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 27/01/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 27/01/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल. पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन .... बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन .... आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय.

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 23/01/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला.... आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ? पुढे :- आई ने जाताना माझ्या आवडिचे बेसनचे लाडु व भडंग करुन दिला व काही पैसे खिश्यात ठेवले, अक्काने पण आपला बॉलपेन दिला व म्हणाली " दादा, परिक्षा देऊनच, ये. परत." मी जसा कैद्याला फाशीसाठी घेऊन जातात तसे तोंड करुन बाबाच्या मागे चालू लागलो, थोड्या वेळाने कोल्हापुर बस स्थानकावर आलो, बाबांनी मला एके जागे बसवलं व ते गाडीची टाईमींग विचारायला गेले, समोर मुतारी होती.. मी आपलं सामान तेथेच व्यवस्थीत लावले व सरळ मुतारी कडे गेलो.

(विचार)मंथन!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 23/01/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले.