Skip to main content

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

बिल्लु ( ) ... परीक्षण .......सुसह्य ( संशयाचा फायदा...)

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 16/02/2009 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी जालावरची चित्रपटाची परीक्षणे वाचत नाही फारशी... पण टीव्हीवरती काही चॅनलवरती या चित्रपटाविषयी संमिश्र परीक्षणे पाहिली, काही समीक्षकांनी चित्रपटाला मजबूत झोडलेलाही पाहिले..... त्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा आधीच कमी झालेल्या होत्या.... तरीही एका मित्राच्या आग्रहाने सिनेमा पहायचा योग आला... ... अपेक्षा अगदीच खाली असल्याने मला चित्रपट आवडला, असा निष्कर्ष मी काढला....... ....प्रियदर्शनचा सिनेमा म्हणजे कुठल्याशा मल्याळम किंवा तमिळ सिनेमाची फ्रेम टू फ्रेम कॉपी असणार हे खरंच... तसंच आहे... गोष्ट साधीच...

लागण व्हॅलेंटाईनची!

लेखक रेवती यांनी रविवार, 15/02/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्‍यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल. तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते. आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्‍यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते.

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

प्रेमदिनाची पूर्वसंध्या

लेखक जयवी यांनी गुरुवार, 12/02/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उगवला हळुवार अलार्म पण किणकिणला नाजुक कूस वळवून बघते तर नवरा उभा हसतमु़ख हातातलं गुलाबाचं फुल लाल गालावरुन फिरलं पिसासारखं "How Romantic Jaanu !" मन नाचलं थुईथुई मोरासाऱखं लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन मूडात होती भलतीच स्वारी म्हटलं घ्यावा भाव खाऊन जे जे वाटतंय करवून घ्यावं ते ते घ्यावं करवून "कैसे मिजाज है आपके जानम ?" जेव्हा सवाल आला म्हटलं "जायचंय आज मला... "रब ने बना दी" बघायला " एरव्ही ह्याला शाहरुखची त्या कायम असते ऍलर्जी आज मात्र चक्क बोलला, "जैसी आपकी मर्जी " हॉलवरची झुंबड बघताच जीव मा
Taxonomy upgrade extras

"कुठे काय" विषयी थोडेसे...

लेखक वाचक यांनी बुधवार, 11/02/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

गाव...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 10/02/2009 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेबद्दल थोडंसं काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं.
Taxonomy upgrade extras