Skip to main content

मॅजिक किंगडम!

लेखक मीली यांनी गुरुवार, 22/04/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
मॅजिक किंगडम लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.

मुक्तपीठ आणि कमेंट्स

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 22/04/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे: एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हाँगकाँगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हाँगकाँगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती!!

लेखक नीधप यांनी बुधवार, 21/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे. आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63… या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं.

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

आभाळ फुटलं !! (Cloud Burst)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 20/04/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
“आभाळ फुटणं” म्हणजे काय हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. आतापर्यंत हा एक फक्त वाक्प्रचार म्हणूनच ऐकला होता. पण त्या दिवशी त्याचा तो भयंकर अर्थ कळला. १७ एप्रिल ! सकाळ नेहेमीसारखीच उगवली. आमची सकाळ ६ वाजता सुरु झाली. पिल्लू क्रिकेट कोचिंगला जायला निघालं. त्याची तयारी झाली……..आणि मी कामं आटपायला सुरवात केली कारण आज हे सेऊलहून येणार होते. Emirates ची फ्लाइट होती. दुबईला थांबून मग इथे कुवेतला ८.२५ ला पोचणार होती. मी त्यांना घ्यायला साधारण सव्वा आठला निघणार होते. आठ वाजले. मी देवाजवळ दिवा लावला. मी दिवा लावला तेव्हा सकाळचा प्रकाश होता.

फ्लोरिडा वॉल्ट डिस्ने पार्क

लेखक मीली यांनी मंगळवार, 20/04/2010 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो. तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे! म्हटले यावेळी आपण का मागे राहावे!

चतुर

लेखक झकासराव यांनी सोमवार, 19/04/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो. तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं. 1

प्रेमभंग ???? छे छे हे काही औरच......

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 19/04/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमभंग हा शब्द कोणत्या शहाण्या माणसाने (गाढवाने) शोधला कोण जाणे???? जर प्रेम करणारे दोघंही खरे असतील तर त्यांचे प्रेम एवढेही दुबळे नसावे की त्याचा भंग व्हावा ??? हां....त्यांचे लग्न होणार नाही कदाचित???? आपल्या समाजात काही संदर्भ परस्परांना उगाचचं जोडलेले असतात... जसे दोन प्रेम करणा-यांचे लग्न झाले तरचं त्यांचे प्रेम यशस्वी झाले..... तरच ते खरे होते.... पण काही अडचणींंमुळे नाही होऊ शकले तर फार मोठे नुकसान वगैरे....

"विस्कटलेल्या विचारांचा गुंता"

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 19/04/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ साधारण रात्री ७.३० वाजताची.... तिन्ही सांजेची.... लाईट गेली त्यामुळे डोक्यावर गरागरा फिरणारे पंखॆ अचानक बंद झाले.... म्हणून जीवाची काहिली थंड करण्यासाठी शांत निवांत अंगणात पहुडले... इतक्यात लक्ष्य आकाशात शांतपणे हसणा-या चंद्रकोरे कडे गेले.... नाजूक.. विवर्धमान... तेजस्वी... हसरी..सोबतच्या चांदण्याबरोबर सुखात हितगुज करणारी....चंद्रकोर माझ्याकडे मिस्किलपणे हसत असल्यासारखी वाटली... ती म्हणाली, " काय गं ?? अशी का तू अस्वस्थ??? माझ्याकडे पाहून आनंद नाही का होत तुला??" मला काय ऊत्तरावे हेच कळेना!!!!