Skip to main content

अस्तित्वाचा पुरावा!

लेखक भोचक यांनी सोमवार, 24/05/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही.... --------------------------------------- मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

सत्यकथा: भाकड म्हैस!!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी रविवार, 16/05/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः साल १९६८... भंडारा... कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र) दुपारची वेळ. पोष्टमन टपाल देणास आत आला. ते रजिस्टर टपाल होते. नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले. साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले. तसे त्यांच्या चेहेर्‍यावरचे हाव भाव बदलू लागले. जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते. साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले. दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.

सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 14/05/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सिगरेट कशी सोडावी अश्या आशयाचा एक लेख मधे पहाण्यात आला होता. मी माझी सिगरेट ओढण्याची १४-१५ वर्ष जुनी सवय गेल्या जुलै महिन्यात सोडली. त्या आधी २ वर्षापूर्वी अ‍ॅलन कार नामक ग्रुहस्थाचे पुस्तक वाचून मी २ महिन्यांसाठी सिग्रेट सोडली होती. पण परत माज करून ओढायला सुरवात केली. पण हे पुस्तक मला उपयोगी वाटले. आपल्यापैकी कुणाला सिग्रेट सोडायची असल्यास हे पुस्तक जरूर वाचून पहा. आणि फायदा झाल्यास नक्की कळवा इथे पिडिएफ चढवायची सोय नाही त्यामुळे हे पिडिएफ स्वरूपातील पुस्तक मिमराठीवर चढवले आहे.

मानसिक छळ्/हिंसा

लेखक पुरणपोळी यांनी गुरुवार, 13/05/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहि काहि लोक दुसर्यांना दुखावण्यात पी एच डी असतात. माझ्या जवळ्च्या ओळखितली ( नातेवाईकच) बाई.. मी फ्लट घेतला आणि ही बघायाला आली ( न बोलावता). दारात पाउल टाकल्या टाकल्या हिचे उद्गार,, " येवढा काहि वाईट नाहि.. बरा आहे. तरी सुदधा ह्या एरियात म्हणजे जरा.." आता हि बाप आणि नवरा पुण्याईमुळे एका विवि़क्षित शहरातल्या विषेश उपनगरात रहाते. पण येवढा माज? कुठलीहि गोष्ट घेतली आणि हिनि पाहिलि कि हिचा प्रश्न, केव्ढ्याला? किमती वरुन प्रत्येक गोष्टिची किंमत करते. मी गाडि घेतली तेव्हा हीचा येवढा जळफळाट झाला, मुळ स्वभावाप्रमाणे तीने लगेच रंगावर टिका केली.

एका रिक्षावाल्याची गोष्ट

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 12/05/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या" "आठ कसले ?

आणखी बुडीत खाते ('त्या' बुडीत खात्यांशी संबंध नाही)

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 12/05/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
बुडीत खात्यांची चर्चा चालू आहे म्हणून माझा वेगळा अनुभव. शीर्षकातच डिस्क्लेमर आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी एकटाच मद्रासला गेलो होतो. एग्मोर भागात कंपनीचे गेस्टहाऊस होते. तेथे रहात होतो. नेहमी २-३ दिवसांसाठी जातो तेव्हा तडतड करून, रात्री उशीरा काम करण्याची पद्धत असते. पण यावेळी चांगला १०-१२ दिवसांचा मुक्काम होता त्यामुळे थोडा निवांतपणा होता. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इकडे तिकडे भटकणे, मग जेवण आणि झोपणे असा कार्यक्रम होता. एके दिवशी संध्याकाळी असेच फिरताना लोकांकडे पहात पहात चाललो होतो. कसे काय ते माहिती नाही पण जवळच असलेल्या एका इसमाशी नजरानजर झाली.