Skip to main content

कामणदुर्ग

लेखक बज्जु यांनी सोमवार, 29/03/2010 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कामणदुर्ग ठाणे जिल्ह्यातील उंचीत माहुलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा किल्ला (उंची साधारण २२०० फुट). तीन साडेतीन तासांचा खडा चढ, जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्‍या, सोप्या श्रेणीचे कातळटप्पे या ट्रेकर्सना आकर्षीत करणार्‍या सर्व गोष्टी असुनही, केवळ माथ्यावर पाणी आणि निवारा नसल्यामुळे दुर्लक्षीत राहिला आहे. प्राचीनकाळी उल्हासनदीतुन चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. तर अश्या या दुर्लक्षीत किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही चौघे जण या रविवारी (दि.२८ मार्च, २०१०) सकाळी ६.३० ला बाईकवरुन निघालो.

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

"न येती उत्तरे'' काही अनुभव......

लेखक प्रमोद काळे यांनी गुरुवार, 25/03/2010 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रमोद काळे. पुण्यात राहतो. पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या सांस्कृतिक संस्थेबरोबर काम करतो. नाट्य लेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण यात विशेष रस. नुकतेच मी "न येती उत्तरे" नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले. त्याचे आजवर सात-आठ प्रयोगही झाले. हे सर्व घडत असताना आलेले विविध अनुभव कुठेतरी नोंदणे महत्त्वाचे वाटले. म्हणून हा एक प्रयत्न. नाटकाची संकल्पना अनेक दिवस मनात होती. पण विषय समलैंगिकता असल्याने या विषयाचा अभ्यास, जाणकारी असणे महत्त्वाचे होते. हा विषय आपल्या समाजात मोकळेपणाने चर्चिला, बोलला जात नाही. त्याला सामाजिक कारणे खूप आहेत.

चित्रगुप्ताची कैफ़ियत : दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. चित्रगुप्ताची कैफ़ियत दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १. नमस्कार मंडळी, मी चित्रगुप्त......

ओरिसाच्या खेड्यातील एक दिवस...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/03/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी ओरिसा कृषी मंत्रालयासाठी एक छोटासा सर्व्हे प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणुन भुवनेश्वरला गेलो होतो. भुवनेश्वरपासुन साधारण १०-१५ किमी अंतरावर असलेल्या बलियंता नामक छोट्याशा गावातील एका शेतात आम्ही कॅडस्ट्रल मॅपिंगसाठी हा सर्व्हे केला. आमची कंपनी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स (GPS) विकते. GPS वापरुन शेती किंवा शेतांचा सर्व्हे हा प्रकार युरोपात सर्रास वापरला जातो. पण भारतात अजुनही हे तंत्रज्ञान वापरले जात नाही. इथे अजुनही सॅटेलाईट इमेजरीच्या साह्याने काही गणिते बांधुन कॅडस्ट्रल मॅपिंग केले जाते.

किल्ले दुर्ग आणि धाकोबा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 25/03/2010 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले दुर्ग आणि ढाकोबा (मुरबाड परिसर) शनिवारी पहाटे ५.०० च्या सुमारास ठाण्याहुन बाईकवरुन निघालो. दोघेच. मुरबाड एस्.टी. स्टॅन्डवर आलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. वाफाळलेला चहा घेतला आणि रामपुर या दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्याचा रस्ता विचारुन घेतला. स्टॅन्डच्या बाजुनेच जो रस्ता धसईला जातो त्याच रस्त्यावर पुढे रामपुर लागते. रामपुरला येईपर्यंत ८.३० वाजत आले. रामपुर गावात एका घराच्या अंगणात बाईक लावली आणि जरा वाट दाखवायला कोणी मिळ्तय का त्याची चौकशी सुरु केली. रामभाऊ नावाचे एक मामा वाट दाखवायला तयार झाले. लगेच निघालो.

माथेरान....!!!

लेखक कैलास२४३ यांनी बुधवार, 24/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो हे माझे पहिलेच लेखन आहे..काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमस्व... २००७ च्या पावसाळ्यात आम्ही चार जण माथेरानला हुंदडायला गेलो होतो..त्यातील काही फोटो आणि त्याचे वर्णन येथे देत आहे... जेव्हा आम्ही तिथे गेलो त्यावेळी ढगफुटी झाल्यासारखा पाउस कोसळत होता..आणि माथेरनची टॉय ट्रेन जून ते नोव्हेंबर बंद असते.. हा पहिला फोटो सह्याद्री एक्सप्रेस मधून खंडाळ्याच्या स्टेशन जवळ काढला आहे... आणि हा फोटो नेरळ स्टेशन जवळचा..!! माथेरानला जाण्य