सा S S प!!!
होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता.
पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. ---
इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली.
मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली.
मिसळपाव
शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते.