माझा 'रेल्वे पोलिस' अनुभव
"सुम्या....चल रे आवर पटकन.... साली ८.३० ची लोकल सुटायची." मी बुटाची लेस बांधत ओरडलो.
एम.एस्सीच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाची गोष्ट आहे. एम.एस्सी ची चौथी सेमिस्टर म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग असायाचं. माझ्या सुदैवाने मला एका छोट्या कंपनीत म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी जॉब मिळाला होता. आता सुदैवाने म्हणणं योग्य आहे कारण पहिल्या सेमिस्टर पासून प्लेसमेंट होइपर्यंत एकतर मला कधी फ़र्स्टक्लास वगैरे काही माहितच नव्हता. उलट एटीकेटी, जयकर का काय तो नियम (इतर विषयात पास झाल्यावर एखाद्या विषयात २-४ मार्क वाढवुन पास करतात तो नियम) वगैरे सारख्या सुविधांचा यथेच्छ वापर करीत आपलं शिक्षण चाललं होतं.
मिसळपाव