Skip to main content

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

ती

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो.

वंशावळी : एक ओळख

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 29/06/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
वंशावळी : एक ओळख मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata श्री.

कृष्णा नी बेगने..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/06/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा नी बेगने..(येथे ऐका) (हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी.

आठवणीतल्या मैफली - १

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 24/06/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईला आयायटीत असतानाची गोष्ट. झेवियर्स कॉलेजने 'मल्हार के प्रकार' सादर करण्यासाठी गंगुबाई हनगळाना आमंत्रित केलं होतं. गंगुबाईना माझ्या सांगितीक अनुभूतीच्या अवकाशात एक विशेष स्थान आहे. या कार्यक्रमापूर्वी मी त्यांना रेडिओवर संगीतसभांमध्ये फक्त ऐकायचो. प्रत्यक्ष मैफल ऐकायचा हा पहिलाच योग होता. झेवियर्स मधली ही मैफल बर्‍यापैकी रंगली होती, पण मला काही तरी हवं होतं आणि ते मिळत नसल्याची एक रुखरुख मनाला लागली होती.

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस

लेखक बट्ट्याबोळ यांनी रविवार, 20/06/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ... मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे. जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ... कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते. आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा. ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.