Skip to main content

त्रुटी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 04/06/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का? हो. "वयोमानाप्रमाणे जरा सबुरी घ्या की". बर. "मुलाचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असेल ना?" हो. "कितीचा जॉब मिळाला?" अजुन मिळायचा आहे. "क्काय?" परिक्षा संपुन आताशी महीना तर झाला. "पण तो यु.डी.सी.टी.मधला ना?" हो. "कँपस मधे जॉब मिळाला नाही?".. जास्त कुणी आले नाहीत. "क्काय सांगताय? मला तर वाटले की कँपस मधे कमीत कमी पन्नास साठ चा जॉब मिळाला असेल." वर्षाला का महीन्याला? "काय चेष्टा करताय सर? युडीसीटीवाल्याला वर्षाला पन्नास?" शक्यता नाकारता येत नाही. "कठीण आहे. हीच तर आपल्या शिक्षण प्रणाली ची त्रुटी आहे.

विलोभनीय नायगरा!

लेखक मीली यांनी शुक्रवार, 04/06/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना!

भोचकपणा नुसता.....

लेखक भानस यांनी गुरुवार, 03/06/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे.....

गारांचा पाऊस

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 03/06/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन!

कविता होताना!

लेखक नीधप यांनी गुरुवार, 03/06/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं. मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे? खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं... मग मैत्रिणीने कोडंच घातलं... "परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी.... कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?" असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले.

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/06/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला. आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 30/05/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव
वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.
विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे.

बालपण...

लेखक मानस् यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण... दिवाळी चे दिवस … आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे… दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे. दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या… सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे. दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.