Skip to main content

माझे पोहणे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 14/08/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते.. खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण... मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल...

शब्द

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 14/08/2010 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिगारेट का सोडली. श्री सुधीर काळे ह्यांचा लेख वाचून पुर्वी लिहून ठेवलेली ही स्वानुभवाची कथा आठवली. ....... ' शब्द. फ़ोनची घंटी वाजताच स्वातीने धावत जाऊन फ़ोन उचलला. मी अगदी मजेत आहे आई. तू काळजी करू नको. काळजी वाटणारच गं! लग्नानंतर इतक्या लांब गेलीस. तिथे तुम्ही दोघेच. सगळं घर लावायचं. कोणी मदतीला नाही..... विकास काय म्हणतात? त्याचं काम छान सुरू आहे. संध्याकाळी तसा लवकरच घरी येतो. दिवसभर मी एकटीच घरी. तू काळजी घे बाई. आई तू आली असतीस आमच्याबरोबर तर किती छान झाले असते! पण तुझी शाळा.

मला आलेला अनुभव

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 13/08/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार... मी इथे नवा आहे त्या मुळे माझा लेख इंग्रजीमधुन लिहीत आहे.

लव फळ

लेखक जागु यांनी गुरुवार, 12/08/2010 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्‍या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे. हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे.

आणि मी सिगरेट सोडली...

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/08/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आणि मी सिगरेट सोडली... सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा!

महाभारत

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 12/08/2010 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
टू, संपादक मंडळ. हा लेख थोडा जरी असभ्यते कडे वळणारा वाटला तर खुशाल काढून टाकणे. ही माझ्या आयुष्यातली घटीत घटना आहे. महाभारत. मंडळी, पुस्तकी भाषेपेक्षा बोली भाषा कशी श्रेष्ठ आहे याच कालच एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर घडल. कधी कधी अशी काही विदुषकी समस्या आपल्यासमोर उभी राहते की सांगताना स्वत:चा अन दुसऱ्याचा आब राखून कस बोलाव असा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा रहातो. पण यातून तोड निघते ती आपल्या खेळकर बोलीभाषेतून. अगदी हसत हसत दुसऱ्याची चुक त्यालाही तेव्हढंच हसवत सांगावी तर या 'बाजीराव' भाषेतच! बघा केव्हढ विषयांतर झालं ! तर महाभारत.

जगन्याचि कला

लेखक अशक्त यांनी गुरुवार, 12/08/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.

मास्तर

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 11/08/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लागल्यापासुन मास्तरनं पिच्छा पुरवला. मास्तर म्हणजे प्रकाश कर्दळे, इंडियन एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीच्या सुरुवातीपासुनचे संपादक. पत्रकारितेतले दिग्गज.