Skip to main content

झेंडा फडकणे...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 21/08/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक मोठी मजेशीर गोष्ट आहे. तितकीच करूणही... आम्ही कॉलेजला असतांना अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या. असेच एकदा एका मैत्रिणीसोबत मी इव्हिनींग वॉक करीत होतो. तेव्हा ती रस्त्यातच पोट धरून गपकन् बसली. कळवळू लागली. तिला खूप वेदना होत असाव्यात. मी भांबावलो. 'काय झालं? अपेंडीक्स दुखतंय का? तुला स्टोनचा त्रास आहे का? मग होतंय तरी काय तुला?' मी प्रश्नांच्या फैरी झाडत माझं वैद्यकीय ज्ञान पाजळत होतो. त्यावर ती कसनुसं तोंड करीत म्हणाली, 'अगोदर मला रुमवर जाऊन टॅबलेट घ्यावी लागेल. प्लिज पटकन् एखादी रिक्षा कर.' मी धावाधाव करून एक रिक्षा आणली व तिला रुमवर सोडलं.

भटकंती झाली सफल

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 19/08/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. 1स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले.

शिवाजी महाराज

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/08/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो . तिथे पोरांना इंटरनेट शिकवले मस्त मजा आली .. मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ... पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 15/08/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!! अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली.