Skip to main content

पुणेरी विक्षिप्तपणा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 11/08/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

पन्हाळा-

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 09/08/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत.

काही वैचारिक आजार

लेखक मितान यांनी सोमवार, 09/08/2010 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :? माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही!

[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.

लेखक बरखा यांनी रविवार, 08/08/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्‍या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन

स्वप्नधुंद

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 07/08/2010 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल कोपरयात दडलेले काहीबाही... नकळत वर येते, जाणवतही नाही... खळखळून हसणं, जागवलेल्या रात्री, उबदार गप्पा.. आणि बोलून बोलून लागलेली भूक. कधीतरी कशाचातरी धरलेला राग.... मनाच्या कोपऱ्यातला इवलासा वण... मीच बरोबर होतो तेव्हा... हेका अजून ... मलाच नाही पटत.., तरी खोटा प्रयत्न. निसटून गेले क्षण, एका बेसावध क्षणी... उरतो आता केवडा, आणि चुकार एखादा मणी... आतून आतून येते हाक, मोहरता सुगंध... गंधांच्या शय्येवर, रात्र स्वप्नधुंद.. टीप - मुक्तक लिहिताना ते थोडं कवितेच्या आकृतीबंधात गेलय खरं. पण मुक्तक लिहित होतो म्हणुन या विभागात टाकतोय, समजुन घ्या

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....